मेरा कुछ सामान ...

(असं म्हणतात की, The best love stories in your life happen when you dont know anything about love. Well, I still dont think I know anything about love. पण नक्की आठवतय 'नंदा प्रधान' वाचताना जे झालेलं माझ्या मनाचं ते.. आणि त्यानंतर भेटलेल्या, न भेटलेल्या अगणिक लोकांविषयी वाटलं ते.. त्या सर्वांसाठी..)
**************************************************
नातं बनतं म्हणजे काय?
नातं तुटतं म्हणजे तरी काय?
कोणतंही नातं बनत नाही..
तुटत तर त्याहून नाही...
जिग्-सॉ पझलसारखच वाटायला लागतं आयुष्य कधी कधी,
सगळ्या गोष्टी असतात,
त्या फक्त शोधुन जागच्या जागी बसवायच्या..
तसच काहीसं होतं का नात्यांचं?
आपल्या मनात सगळ्याच नात्यांची काही काही रुपं असतात,
आणि मग माणसं बघुन ती भरायची..
अपेक्षेपलीकडची नाती कधी असतात का?
घटना बदलतील कदाचित,
मतितार्थ मात्र तोच..!
आयुष्याचा कॅनव्हास इतका मोठा झालाय,
कसं रहायचं मर्यादित प्रेम करत?
प्रत्येक मित्रात सापडलेला थोडा थोडा प्रियकर
आणि प्रत्येक प्रियकरातला खूपसारा मित्र..
आणि काही काही तर अगदीच कधीही न भेटलेले पण..
कुणाचा धीरगंभीर स्वभाव आणि गाईचे डोळे,
कोणी उत्साहाचा झरा,
कोणाच्या कुंचल्यात जादू,
कोणाच्या गळ्यात..
कोणी प्रचंड आदराला पात्र,
आणि कोणासाठी उगीचच दाटुन आलेली माया..
कोणी नुसते निर्मळ..
कोणी समजुतदार आणि प्रेमळ..
कोणाचा निर्हेतुक खमकेपणा,
तर कोणाचा सहेतुक थंडपणा..
माझं मलाच कळतय आज प्रेम किती प्रकारे करता येवु शकतं..
आणि कदाचित पुढेही कळत राहिल अजून किती प्रकारे?
तुम्ही मला प्रिय होतात..
इतरांपेक्षा प्रिय झालात..
प्रियतम.. प्रियतर...!
'प्रियकर'???
हे लेबल लागलं की नाही,
याने खरच कितीसा फरक पडतो..
प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता..
प्रत्येकासाठी माझ्यापाशी असलेलं दानही वेगळं होतं..
प्रश्न, उत्तरं, व्याख्या आणि बंधनं याच्या पार कधीच पोहचलेलं असतं मन...
आपण का व्याख्या मिळवायच्या नादात माणसं हरवुन बसायचं?
शेवटी व्याख्या आली म्हणजे तिचं अपूर्णत्वही आलं,
अपवादही आले..
त्यापेक्षा शब्दांपलीकडचं सगळच कसं पर्फेक्ट.. परिपूर्ण..
काय फरक पडला आपल्या नात्यात, कबुली दिली गेली किंवा नाही त्याचा..
काय फरक पडला, तुम्हाला माहिती होतं तरी की नाही त्याचा..
आणि काय फरक पडला असता,
अजून काही घोटवलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती झाली असती तर त्याचाही?
खरंतर, नात्याच्या व्याख्येची खरी गरज तिसर्‍याच माणसाला असते..
कोणत्याही व्याख्येत न गुंतता प्रेम करु शकले,
म्हणुनच कदाचित तुम्हालाही खूप कौतुक वाटलं त्याचं..
पण तुमच्यापैकी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याबद्दल कधी कधी वाटतं,
कदाचित कोणीच सर्वांगाने जाणलं नाही मला..
त्याचं वैषम्य वाटावं असंही काही नाही म्हणा..
हत्ती आणि आयुष्याच्या रुपकाप्रमाणे
करतच रहातो आपण चूक
कोणत्याही माणसाला जोखण्याची..
कदाचित मला स्वतःचा थांग अजून लागला नाहीये
त्यामुळे मी शिकलेय कोणाला ओळखल्याचे दावे न करायला..
पण तुम्ही?
तुम्हाला तरी पटलीये का ओळख स्वतःची खरच..?
आणि माझीही? पूर्ण नाही पण पुरेशी तरी?
त्यामुळे, ज्यांनी मला एकाच कोनातून जोखलं,
त्यांच्या वाट्याला दु:ख आलंही असेल..
ह्म्म...
तुम्हाला समजलं की नाही हे मला माहित नाही,
पण तुम्ही कोणी कधीच नव्हतात एकमेकांच्या रीप्लेसमेंट्साठी..
माझ्या प्रिय प्रियकरांनो,
शेवटी आज मी जी काही आहे ती तुमच्यासकट आहे,
कोणाला.. अगदीच कोणालाही न वगळता...
माझ्या असण्यात जितकी मी आहे,
तितकेच तुम्हीही आहात...
शेवटी माझी तुमच्यापासून सुटका नाहीच..
जिथे स्वतःपासूनच सुटका नाही तिथे तुमच्यापासून कशी?
(तशी माझी सुटका तुमच्यापासून नव्हतीच कधी..
कारण मला बांधुन घालणारेही तुम्ही नव्हताच..
इथे स्वतःच्याच निर्दय तावडीत सापडलेय मी..)
असो.. तुम्ही भेटलात,
मी अजून भेटले स्वत:ला..
स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्या प्रवासातल्या काही वाटा,
अधिक मोहरल्या असतील कदाचित,
सुकर वाटल्या असतील कदाचित,
उलट बर्‍याचदा तुमचा उत्प्रेरक म्हणुन फायदाच झाला
त्या वाटा जोखताना...
मला माझ्याच आयुष्यात असं मुरवत नेल्याबद्दल
तुमचे आभार..
**************************************************
13 Responses
 1. Unsui Says:

  उत्क्रांतीच्या वाटेवर मनुष्य प्राणी जर इथवर आला नसता तर? भाव भावना, प्रेम, लोभ, हेवे दावे, मत्सर, नाते संबंध, कुटुंब, समाज, स्वीकार, अव्हेर, योग्य, अयोग्य, या साऱ्या गोष्टींचा आपणच केलेला गुंता आणि तो सुटत नाही म्हणून केलेली व्यर्थ धावपळ, आपल्या चष्म्यातून आपल्याला दिसलेले सत्य इतरांनी स्वीकारावे, शिक्के मारून घेणे आणि शिक्के मारत राहणे. कधी आपल्यावर मारले गेले नाही तरी आपण जबरदस्तीने मारलेले आणि कधी आपण कुणावरही न मारता आपल्या परवानगीशिवाय आपल्यावर मारलेले, हे आणि असे अनेक गुंते सर्वत्र पाहिले कि पुन्हा एकदा वाटते. उत्क्रांतीच्या वाटेवर मनुष्य प्राणी जर इथवर आला नसता तर? जग खरोखर मुक्त झाले असते, जन्म ते मृत्यू मधील सर्व टप्पे सर्व शिक्क्यांशिवाय व्यवस्थित पडले असते...


 2. धन्यवाद Unsui,
  खूप खूप सुंदर विवेचन..! फारच सुंदर लिहिलत.. अगदी काव्यत्मक ललित.. :-) तुम्हाला अजून काही छान चर्चा वाचायला आवडतील कदाचित...!

  http://www.maayboli.com/node/25699


 3. Unsui Says:

  Thanks for kind words of appreciation. Actually reading blogs like this has brought me out of retirement and I posted that comment as a blog post on my new blog. So thanks for triggering the thoughts...


 4. :-) Your comment deserved independent posting as an article.. Great that you did it. :-)


 5. Prajakta Says:

  :-)
  वाचताना गौरी (गौरी देशपांडे) आठवत होती...खासकरून "तेरुओ"..


 6. Prajakta,
  कसलं मनातलं बोललीस.. तसाच काहीसा विचार.. साधारण तोच पिंड ही कविता लिहितानाचा... :-)


 7. Prajakta Says:

  hmm...jaNawlch te :-) (khupch ushira wachtie mi ha rply..sry..)


 8. tejali Says:

  प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता..
  प्रत्येकासाठी माझ्यापाशी असलेलं दानही वेगळं होतं..
  kiti perfect lihilays!!
  kharach asa pratyek mitrane vichar kela tar jaganatale complications kiti kami hotil na?
  kharach agadi tantotant khar lihilays!!
  punha manen mazya manatle v4 tuzya hi manat kase aale g?:)
  any way..keep writting..i'll keep reading:)


 9. Thanks a lot Tejali.. :-)
  Its good to see that you are loving it.. Keep visiting for more..


 10. Anonymous Says:

  मी अजून भेटले स्वत:ला..
  स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्या प्रवासातल्या काही वाटा,
  अधिक मोहरल्या असतील कदाचित,

  Apratim lihlayas Shweta.. Vachen titka kamicha vatat.. aata tar saglech posts vachawe lagatil..


 11. Thanks Priyanka..
  Yea, read the posts and share your views... You are always welcome for that.. :-)


 12. Anil Says:

  भारी लिहिलंय बरं का! योग्य शब्दयोजना, वाहती मांडणी आणि महत्त्वाचे प्रश्न व बऱ्याचशा बाजूंना सामावून घेण्याची विचारपुर्वकता यांचा बऱ्यापैकी मेळ बसलाय इथे! आणि यातलं बरंचसं तर अगदीच मनातलं, त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती प्रतिसादात करण्यात अर्थ नाही. जसं कि सगळ्या प्रकारच्या प्रेमाच्या नात्या-गोत्यांमधल्या अनुभवांनी आपल्याला आयुष्यात मुरवत नेणं. किंवा आपलं थोडंसं सगळ्यांमध्ये आणि त्यांचं थोडंफार आपल्यामधे उतरत जाणं.. हे सगळं माझ्याही अनुभवातलं. पण यालाच आज आणखी एक पुरवणी जोडावी म्हटलं आणि आपल्यावर कधीतरी प्रेम केलेल्यांचा किंवा करणाऱ्यांचा विचार आला.. आठवणी आल्या. त्या सगळ्यात असं काहीसं जाणवत आलेलं कि, कुणालाच स्वतःची पुरती ओळख नसतानाही एकमेकांना जोखण्याचा प्रयत्न करण्याची नादान हिम्मत करतोच माणूस कधी कधी. आणि त्याही पुढे जाऊन स्वतःला दुसऱ्याच्या नजरेत शोधण्याची आणि त्यातून स्वतःलाच समजून घेण्याचीही गुस्ताखी होतेच त्याच्याकडून. दुसऱ्याला आपल्याबद्दल काय वाटतं यातून आपण पूर्णपणे काय आणि कसे आहोत हे ठरवणं यासारखा वेडेपणा नसेल दुसरा. आणि मग हा वेडेपणा चांगलं समजणं आणि वाईट समजणं या दोन्हीही बाबतीत होतोच. आणि यातून आता इथे एक भयानक विचार पुढे येतोय तो असा कि.. कधी कधी प्रेमात पडल्यावर आपल्याला जाणवणारं त्याचं किंवा तिचं सगळं सौंदर्य हे फक्त आपल्या दृष्टीतच असेल आणि त्यातलं काहीच खरं नसून (किंवा ते तसं नसून), सगळे फक्त आपल्याच मनाचे उमाळे असतील तर? आणि तरीही त्याने किंवा तिने तेच त्यांचं सौंदर्य आहे असा समज करून घेऊन त्याच्याच जीवावर स्वतःला सजवायला घेतलं तर? ..तर मग यावर Sylvia Plath तिच्या 'Soliloquy of the Solipsist' या कवितेत त्याला जे म्हणते ते त्याच्या सहन होण्याच्या पलिकडचं आहे.. ते काहीसं असं कि,

  I?
  I walk alone;
  The midnight street
  Spins itself from under my feet;
  When my eyes shut
  These dreaming houses all snuff out;
  Through a whim of mine
  Over gables the moon's celestial onion
  Hangs high.
  .
  .

  I
  Know you appear
  Vivid at my side,
  Denying you sprang out of my head,
  Claiming you feel
  Love fiery enough to prove flesh real,
  Though it's quite clear
  All your beauty, all your wit, is a gift, my dear,
  From me.

  – Sylvia Plath


  Sylvia Plath.. ओह्‌, I hate myself for liking some of her poems. It is terrifying how she writes it.. like portraying the true darkness. The way she says it.. it feels horrible at times. स्वयंभू असा काळोख उभा करते ती. ग्रेसच्या बाबतीतही होतं माझं असं, पण ग्रेसचा द्वैतीपणा वाचवतो बऱ्याचदा त्या कचाट्यातून. पण ही बाई height-च करते राव, तोडून फोडूनच ठेवते सगळं. त्यामुळे एकदा तिच्या कचाट्यात सापडलं कि मग there is no escape from it! अवाक्‌ होऊन पहातच रहावं तिच्या तशा कवितांकडे. आणि डोळे फाडून पाहिलं तरी त्या अंधारात काहीच दिसत नाही. पण कधी कधी खूप खरा वाटतो तोच काळोख.. एखाद्या साक्षात्कारासारखा!