मेरा कुछ सामान ...
दुरूनही चाललो असतो सोबत,
फुलली असती आपली बाग..
तुझ्या पाठी माझा वेडेपणा,
माझ्या पाठीवर तुझा राग...

जमलं नाही समजून घेणं,
तुला थोडं, मला थोडं..
मधल्या मधे भांबावलेलं,
तुझं माझं नातं वेडं....

बरोबर आहे तुझं म्हणणं,
प्रेम बीम खोटंय सगळं..
तुझं माझं एकच दुःख,
पण तुझं वेगळं, माझं वेगळं.....
10 Responses
 1. Kya baat hai... तुझं वेगळं, माझं वेगळं..
  Khup sunder... Keep writing.. आम्ही वाट बघतो कवितेची... 2. Anonymous Says:

  तुझं वेगळं, माझं वेगळं..

  क्या बात है....खूप दिवसांनी ब्लाॕगवर लेखन आलं तुमचं....
  खूपच सुंदर... 3. Anonymous Says:

  लेखन थांबवलयं का आपण?.... 4. भारीच!१ नंबर 👌👍👍👍