मेरा कुछ सामान ...
कसं सहज जमतं तुला?

नेटक्या विणलेल्या वस्त्रासारख्या
तुझ्या आयुष्याकडे बघतेय मी,
हजारदा उसवूनही पुन्हा गुंतलेल्या अस्तित्वाला सावरत..

अट्टहासाने मी काढलेल्या शब्दांच्या रांगोळ्या,
विश्लेषणांची चित्रं..
फिकीच पडतात तुझ्या स्मितहास्यासमोर..

तर्कांचं जाळं पसरुन बसते मी,
तुला नेमकेपणे पकडण्यासाठी..
पण मुठीतून निसटावा सुगंध तसा,
दरवळत राहतोस तू, जाळ्यात बिलकुल न अडकता..

झाडाचं पानही गळताना पाहून
तुटत जातं माझ्यातलं सगळं..
आणि नातं पेलून नेतोस त्याच स्थितप्रज्ञतेनं,
सोसतोस तू सगळी वादळं..

मला जितकं सहज मरताही येत नाही,
तितकं सोपं, सरळ तुला जगता येतं..

इतकं सोपं, सरळ तुला कसं जगता येतं?
14 Responses
  1. Anonymous Says:

    khup sundar lihilay...


  2. K P Says:

    आदाब अर्ज है मोहतरमा!

    कोणाला उद्देशून लिहिलंय, ह्या प्रश्नाचं उत्तर न देण्यातच कविता दडलेली आहे, असते, असावी.


  3. Thanks a lot Anonymous.. :-)

    केदार,
    कोणाला उद्देशून लिहिली आहे हे न कळताही पूर्ण अर्थ लागावा आणि वाचणार्‍याशी कनेक्ट व्हावी यात कविता असते असं मला वाटतं.. तसं शोधायला गेलं तर याच ब्लॉग वर मिळतील काही खुणा. But as I like to put it, 'not all of that is about the same person and not all of them are real'. :-)





  4. aksharmeera Says:

    मला जितकं सहज मरताही येत नाही,
    तितकं सोपं, सरळ तुला जगता येतं..

    माझ्या मनातलं तुझ्या कवितेत उतरलं.



  5. v Says:

    पोरी,कुठून सामील झालीस या आत्मघातकी पथकात? प्रेम अमानुष आणि अत्यंत एकाकी असतं,ही अनुराधा पाटलांची ओळ आठवली.तुझ्या प्रतिभेला सलाम!



  6. Anonymous Says:

    भावाकूल अर्थाला लगडून येणारी टपोर शब्दकळा,
    मनस्वी बिलोर भानाच्या आरस्पानी प्रतिमा,अर्थान्तरातील नादभारीत अवकाशावर जबर
    हूकमत...हे सारं जपायला जमेल?
    ....पोरसवदा होतीस कालपरवा पावेतो
    थांब उद्याचे माऊली.........
    ..बा.सी.मर्ढेकर


  7. गोपाळके,
    मर्ढेकरांची ही कविता-Thats a bit too much for me.. पण कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद.. :-)


  8. Anonymous Says:

    Apratim... :) Kasa kalata tula pratelweli pratekachya manatla.... ?