मेरा कुछ सामान ...

काय झालं..? ....... काही कळत नाहीये...
काही भांडण वगैरे?..... नाही नाही.. किती सारखे होतो (म्हणजे आहोत) आपण ..
काही गैरसमज? .... गैरसमज.. आणि आपल्यात? शक्यच नाहीये..
मग आठवणच यायची बंद झाली का?.. तसंही नाही. रोज नाही पण बरेचदा येतच असते की आठवण..
मग इंटरेस्ट च कमी झाला नाही?... तसं काही झालं असतं तर कशाला एकमेकांना इतक्यांदा साद घातली असती?
मग नक्की झालं तरी काय?
तेच तर कळत नाहीये ना..
आपण कायमच खूप समजून घेतलं ना एकमेकांना?
कधी मी साद घातली तर तू व्यस्त..
कधी तुझ्या हाकेला नेमकी मी व्यस्त..
तरी कधी राग नाही आला..
"काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तू असं करणार नाहीस.."
दोघांनाही ही खात्री..
असा कितीतरी काळ लोटून गेलाय मध्ये..
न भेटता.. न बोलताच..
तुझ्या माझ्यातल्या या अमर्याद अंतरभर आता फक्त समजूतदारपणाच उरलाय..
आणि म्हणूनच कदाचित हे अंतर पार करणं अशक्य आहे आपल्याला..
5 Responses
  1. aativas Says:

    दर वळणावर अंतर पडत जातात अशी ...तेही वास्तवचं एक!


  2. दर वेळेस तुम्ही असं काही लिहिलेलं वाचलं की वाटतं माझीही हीच तर परिस्थिती आहे......


  3. aativas,
    खरंय.. पण वास्तवाची मेंदूला कितीही जाणिव असली तरी मनाला नव्याने वेदना होतातच हेही वास्तव.. :-)


  4. इंद्रधनू,
    :-) आणि तुम्हाला कायम असं वाटणं हे मला कायम आवडतं.. :-)