सृष्टीचं कौतुक जितक करावं तितकं कमीच असं वाटण्याला निसर्ग कायमच नवनविन बहाणे देत असतो मला. दरवर्षी वसंतात फुलून फुलून येणारी आणि भरभरुन वहाणारी फुलझाडं हे त्यातलच एक कारण. शिशिर सरुन गेला की झाडांना फुटणारी पालवी बघण्यात, त्यांचा तो हिरवट कडू गंध अनुभवण्यात, त्या तुकतुकीत कोवळ्या पानांना स्पर्श करुन पहाण्यात महिनाभर आरामात निघुन जातो. पण त्याच वेळी निष्पर्ण होवुन कळ्या मिरवणार्या, कुठे कुठे तुरळक फुलू लागलेल्या फुलांच्या तुर्यांनी अजुन लक्ष वेधुन घ्यायला सुरुवात केलेली नसते. हा एक्-दिड महिना सरता सरता बर्यापैकी पानं पोपटीतून हिरव्या रंगात जायला लागतात. तो गर्द हिरवा रंग त्यांचं संथ,एकसुरी आयुष्य वाटतो मला.. त्यातलं अॅडव्हेंचर आता संपलेलं असतं किंवा कदाचित बाहेर तरी दिसून यायचं बंद झालेलं असतं. संथ, शांत, मुलाबाळांत रमलेल्या मध्यमवयीन गरत्या जोडप्यासारखी वाटायला लागतात झाडं बघता बघता.. आणि मग अचानक एके दिवशी डोळ्यात भरण्याइतका फुलोरा दिसतो कुठेतरी.. वसंताची चांगली घमघमीत आणि घवघवीत चाहुल लागते.
थोड थोडा म्हणता म्हणता फुलांचा पसारा चांगलाच वाढायला लागतो. तसा वर्षातला प्रत्येक ऋतू कोणत्या ना कोणत्या फुलांच्या अस्तित्वाने, त्यांच्या परिसरात असण्याने काही खास असा लक्षात राहतो (जसा पावसाळा बुचाच्या फुलांसाठी, मग चांगला जानेवारी उगवेपर्यंत झेंडुसारखी दिसणारी ती पिवळी/नारिंगी रानफुलं- मला त्यांचं नाव नाही माहिती.. ) पण वसंताची बातच और आहे. उगीच नाही त्याला वसंत म्हणत..!
हल्ली पुणे स्टेशनकडून जहांगिरला जाणार्या पुलावरुन पलीकडे उतू जाणारा पांढरा-गुलाबी कॅशिया (हॉर्स कॅशिया) हिरव्यागर्द झाडांच्या पार्श्वभूमीवर अगदी उठुन दिसायला लागलाय. कितीही नाही म्हटलं तरी त्याच्याकडे बघितल्यावर पुसटसं हसु येतच चेहर्यावर. बस मधली शेजारची व्यक्ती हमखास संशयाने बघते त्यावेळी पण सोडा who cares? त्यावेळी ते झाड मला तोंडभर हसुन good morning म्हणत असतं आणि मी त्याला लवकर लवकर ऑफिस संपवुन मावळत्या सुर्यकिरणांना झेलणारं तुझं रूप बघायला परत येईन असं सांगत असते.
कॉलेजला असताना इंजिनीरिंगचं सबमिशन असायचं या दिवसांत. ती सगळी आदल्या रात्री जागुन केलेली कारागिरी भर उन्हाची कॉलेजला घेवुन जायच्या वेळेस ज्जाम चिडचिड झालेली असायची पण त्या तसल्या उन्हात कॉलेजच्या रस्त्यावर पिवळ्याधम्मक अमलताश उभा असायचा.. अर्थातच माझ्यासाठी.. "जाऊ दे गं.. चालायचंच." असं काहीतरी म्हणायचा. तो अमलताश ओलांडून पुढे जाताना हमखास माझा मूड बदललेला असायचा.. कॉजेलची सगळी सबमिशन्स त्याला दाखवुनच केलीयेत मी. अजुनही तिथुन जाताना तो तसाच उभा असतो. त्याच्या आजुबाजुला कसलसं बांधकामाचं सामान आणुन टाकलय. उदास वाटतो हल्ली.. अशा वेळी गुलजारचा अमलताश नाही आठवतो मग..
खिड़की पिछवाड़े को खुलती तो नज़र आता था
वो अमलतास का इक पेड़, ज़रा दूर, अकेला-सा खड़ा था
शाखें पंखों की तरह खोले हुए
एक परिन्दे की तरह
बरगलाते थे उसे रोज़ परिन्दे आकर
सब सुनाते थे वि परवाज़ के क़िस्से उसको
और दिखाते थे उसे उड़ के, क़लाबाज़ियाँ खा के
बदलियाँ छू के बताते थे, मज़े ठंडी हवा के!
आंधी का हाथ पकड़ कर शायद
उसने कल उड़ने की कोशिश की थी
औंधे मुँह बीच-सड़क आके गिरा है!!

मला मात्र माझा तो अमलताश कायम उत्साहाने सळसळणारा वाटायचा पण तो ही हल्ली असाच वाटायला लागलाय.. असो..
वसंतात हमखास भेट द्यावं असं पुण्यातलं ठिकाण म्हणजे डहाणुकर कॉलनी..!! उन्हं ऐन भरात असताना अक्षरशः स्वर्ग अवतरलेला असतो तिथे. बाहेरुन पाहिलं तर खरं वाटणार नाही इतका गोंधळ असतो रस्त्यावर पण एकदा का त्या गल्लीत शिरलं की बास्स...!! तिथल्या त्या बागेच्या भोवती ह्या सगळ्या कॅशिया, गुलमोहर आणि जॅकारंडाचंच कुंपण आहे आणि या सगळ्या फुलांची मिळुन अशी काही रंगपंचमी अवतरलेली असते की भर रस्त्यात गाडी ब्रेक लावुन थांबवलीच पाहिजे.
अशी बरीच ठिकाणं सांगता येतील.. युनिव्हर्सिटीकडून औंधला जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा नुसता गुलमोहर आहे. त्यातला काही लालभडक, काही नारिंगी, तर काही या दोन्हींमधला.. तसा NH4 पण या बाबतीत काही कमी नाही म्हणा. पण औंध रस्त्याच्या शेवटाकडे एक झिपर्या गुलमोहर दिसतो (नामकरण अस्मादिकांनीच केलय) तर तो झिपर्या माझा खास आवडीचा. तसा त्याचा रंग अगदी लालभडक नाहीये पण फुलं भरुन वाहत असतात नुसती आणि इतर वेळी त्याच्या सगळ्या फांद्या झिपर्यासारख्याच दिसतात, त्यामुळे ऐन बहारात फुलांच्या भारामुळे फांदी वाकलिये असा भास होतो. त्यामानाने NCL रोडला गुलमोहर कमी. तिथे जॅकारंडाचं राज्य आहे. अगदी व्यवस्थित जांभळ्या दिसणार्या त्या फुलांना ब्लू जॅकारंडा का म्हणतात हे मला तरी न उलगडलेलं कोडं आहे. ( आणि बोलीभाषेतलं नाव कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा) इतक्या नाजुकशा त्या फुलांना "जॅकारंडा" असलं भरगच्च अफ्रिकन आदिवासी जमातीसारखं नाव कोणी ठेवलय?
तसा वसंतातला सुगंधी ठेवा- चाफा, मधुमालती, मोगरा वैगेरेंना वगळुन तर चालणारच नाही. चाफ्याच्या झाडामागुन उगवणारा चंद्र पाहिला की हटकुन "चांद मातला" ची आठवण येते मला.. त्यातल्या मोगर्याविषयी तर आधी लिहिलच आहे मी. मधुमालतीविषयीची सगळ्यात पहिली आठवण म्हणजे मी अगदी ६-७ वर्षांची असतानाची. आमच्या त्यावेळच्या घरामागे कमानीवर मधुमालतीची वेल होती. ती इतके दाट होती की त्याखालची कमान दिसायचीच नाही आणि मला बरीच वर्षे इतकं आश्चर्य वाटायचं की कसले भारी वेल आहे.! अशी कशी आलिये..? आणि मग लंपनचं "मधुमाल्ती ग्राऊंड..." डेक्कनच्या आतल्या बाजुच्या बंगल्याच्या कुंपणावर हटकुन आढळणारी ही वेल..
मग हळु हळु पावसाळा येईपर्यंत या फुलांच्या सोबतीने १-२ उन्हाळी सहली नक्कीच होतात. अगदीच नाही तरी पुण्यातून इकडे-तिकडे फिरताना आपण थांबुन त्यांची विचारपूस केलीच पाहिजे असा थाट असतोच त्यांचा. तर असला हा वसंत... आता तुम्ही म्हणाल की यात फॅमिली डे चा काय संबंध आला? तर मला हल्लीच शोध लागलाय की माझ्या वसंतातल्या आठवणीतली ही बरीचशी झाडं "गुलमोहर" फॅमिली मधली तर बरीचशी जॅकारंडा फॅमिली मधली आहेत.. :-)

सुंदर लेख! वाचताना सगळे चित्र डोळ्यासमोरून गेले :)
य़ोगेश
-----------------------------------------------
मराठी ब्लॉग्समधून उत्पन्न मिळवा : Maanbindu Music Shopee च्या सहाय्याने!
Thanks.. :-)
झिपर्या गुलमोहर!! best ahe, mast lihilays :-)
Hi nice reading yyour blog