आपल्या भिंगाच्या चष्म्यातून,
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी..
माझ्याकडे काही गुलजा़रसारखा चिरतरुण चंद्र नाही
किंवा साहिरसारखी चिरतरुण वेदना पण नाही..
सतत तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
मग बाहेर काही भेटतय का ते बघावं म्हटलं..
बाहेर पडतच होते,
तर सगळ्यात आधी ऋतूच रुसले..
आतले सगळेच फुरंगटुन बसले..
त्यांची समजुन घालणं तसं अवघडच..
कारण ग्रीष्माचा दाह, शिशिराची वेदना, वर्षेची उत्कटता..
सगळं एकाच वेळी कसं बाजुला सारायचं..?
पुढे जावं तर स्वप्नं होती..
चांगली क्षितिजापर्यंत पसरलेली...
कित्येक तपं मनात मुरल्यावर,
आता कुठे अंकुरु लागलेली..
सूरांकडे तरी किती कानाडोळा करावा...
कितीही दाट असलं धुकं तरी,
कानात घुमत रहातातच की कायम..
ह्म्म...
मनाच्या कुठल्यातरी कोपर्यातून
माझा चंद्र बघत होता हे सगळं..
इतकी युगं सोबत काढल्यामुळे,
आपण फक्त शांतपणे वाट बघायची असते हे समजलेलं त्याला
अनुभवातुन..
त्याच्या पौर्णिमेची मात्र अमावस्या झाली माझ्या या फसलेल्या प्रयत्नात..
तो म्हणालाच शेवटी न रहावुन,
"बाई गं.. पुरे आता..!
किती त्रागा करशील..?"
मीही सुखावले..
स्वतःल सोडून बाहेर पडणं कदाचित जमणारच नाही आपल्याला..
मग पुन्हा तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
जाऊ दे...
आपण आपले असेच बरे...
तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी..
माझ्याकडे काही गुलजा़रसारखा चिरतरुण चंद्र नाही
किंवा साहिरसारखी चिरतरुण वेदना पण नाही..
सतत तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
मग बाहेर काही भेटतय का ते बघावं म्हटलं..
बाहेर पडतच होते,
तर सगळ्यात आधी ऋतूच रुसले..
आतले सगळेच फुरंगटुन बसले..
त्यांची समजुन घालणं तसं अवघडच..
कारण ग्रीष्माचा दाह, शिशिराची वेदना, वर्षेची उत्कटता..
सगळं एकाच वेळी कसं बाजुला सारायचं..?
पुढे जावं तर स्वप्नं होती..
चांगली क्षितिजापर्यंत पसरलेली...
कित्येक तपं मनात मुरल्यावर,
आता कुठे अंकुरु लागलेली..
सूरांकडे तरी किती कानाडोळा करावा...
कितीही दाट असलं धुकं तरी,
कानात घुमत रहातातच की कायम..
ह्म्म...
मनाच्या कुठल्यातरी कोपर्यातून
माझा चंद्र बघत होता हे सगळं..
इतकी युगं सोबत काढल्यामुळे,
आपण फक्त शांतपणे वाट बघायची असते हे समजलेलं त्याला
अनुभवातुन..
त्याच्या पौर्णिमेची मात्र अमावस्या झाली माझ्या या फसलेल्या प्रयत्नात..
तो म्हणालाच शेवटी न रहावुन,
"बाई गं.. पुरे आता..!
किती त्रागा करशील..?"
मीही सुखावले..
स्वतःल सोडून बाहेर पडणं कदाचित जमणारच नाही आपल्याला..
मग पुन्हा तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
जाऊ दे...
आपण आपले असेच बरे...
तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!
Beautiful!!
Thanks a lot..! :-)
इतकं सुंदर लिहिलंयस कि हरवूनच गेलो मी.. रंग, गंध, सूर, ग्रीष्म, शिशिर, चंद्र, समुद्र, सावल्या, पाऊस यांच्या प्रदेशात.. मग स्वप्नांच्या जगात.. आणि मग स्वतःतच.. आह् !.. जणू असं काहीसं व्हावं कि..
पाऊसमोगरा सजणा
सनईचे रंगीत पाणी..
झिमझिमले अंगांगाला
रक्ताच्या मागून कोणी
मोगऱ्यावर पाऊस पडला कि मनही ओलं होतं.. पण कधी मोगऱ्याचाच पाऊस पडला तर? सनईचे सूर अंगाला शहारा आणतात.. त्या सूरांचे रंग या पाण्यात मिसळले तर? ..तर रक्तपेशींच्या संवेदनांना झिमझिमणारे असे अनुभव येतात. आणि कधी या मनमोकळ्या अनुभवांवर कुरघोड्या करणारे आत्मप्रतारणेचे फटकारे किंवा कुणाचे चिकित्सक प्रश्न समोर येऊन त्यांच्या तडाख्याने मनातले दिपकाजावे विझून गेलेच तर पुन्हा रवींद्रनाथांचीच आठवण येते मला. आणि मग त्यांच्या प्रार्थणांची अशी एक छोटीशी रुद्राक्षमाळ विणून माळावी अन् पुन्हा भरारी घ्यावी..
I cast my own shadow upon my path, because I have a lamp that has not been lighted..
and so,
The road is lonely in its crowd for it is not loved..
then somewhere..
The bow whispers to the arrow before it speeds forth– "Your freedom is mine."
and now I'm a free bird on my own flight.. but if you still say that,
Pleasure is frail like a dewdrop, while it laughs it dies..
i would tell you to..
Take my wine in my own cup, friend. It loses its wreath of foam when poured into that of others..
you see..
There are seekers of wisdom and seekers of wealth,
I seek thy company so that I may sing..
बघ आता.. माझं बऱ्याचदा असं होतं कि, तुझे पोस्ट्स वाचताना अशा कधीतरी जीवाच्या वाटलेल्या ओळी, कविता किंवा कथा आठवतात.. तर कधी दुसरं काही वाचताना तुझे पोस्ट्स आठवतात. त्यामुळे मी इथे अशाच ओळी मारत राहणार बघ. Please don't mind.. तुझ्या ब्लॉगच्या निळ्या सरोवराकाठी कधी कधी या चांदण्यांच्या ओळी छान वाटतात मला. कुणी सांगावं काय आहे हे.. स्वप्नं कि भास कि आभास कि अनुभव. काहीही असो, कारण बाकी तसंही माझ्याकडे दुसरं काही खास नाहीच इथे आणायला. आणि आता या विचित्र प्रकारावरही एक गोड पण जीवघेणी अशी कविता आठवतेय मला.. ही मात्र height झाली बरं का! :-) पण काय करणार, एमिली पाठच सोडत नाहीये माझी आजकाल.. हेच बघ ना.. आजही अगदी मनातलं बोलतेय ती.. म्हणे कि,
I've nothing else – to bring, You know –
So I keep bringing These –
Just as the Night keeps fetching Stars
To our familiar eyes –
Maybe, we shouldn't mind them –
Unless they didn't come –
Then - maybe, it would puzzle us
To find our way Home –
– Emily Dickinson
Thanks Anil.. :-)