स्वतःच्या मनात दाटलेल्या अमावस्येला
लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास
माझ्या नजरेत उतरलेला चंद्र...
**********************************
जग नसतं दीपलं पण
वाट दाखवण्यापुरतं चांदणं नक्की होतं
माझ्या चंद्रमौळी आकाशात...
**********************************
भैरवी बरीच रेंगाळली होती,
तरी तू आला नाहिस..
गालावर सुकून गेलं चंद्रपाणी..
**********************************
डोळे गच्च मिटुन
सगळी कवाडं बंद करुन बसले
तरी श्वासात दरवळत होताच चंद्र...
**********************************
चंद्राळलेलं आभाळ नाही मिळालं तुला
पण तोवर माझ्यात रुजला होता
तुझा चंद्राचा हट्ट...
**********************************
निघुन जातात तुझ्यासारख्याच
नि:शब्द शांततेत
हल्ली चाहुली उठवत नाहीत चंदेरी वादळं...
लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास
माझ्या नजरेत उतरलेला चंद्र...
**********************************
जग नसतं दीपलं पण
वाट दाखवण्यापुरतं चांदणं नक्की होतं
माझ्या चंद्रमौळी आकाशात...
**********************************
भैरवी बरीच रेंगाळली होती,
तरी तू आला नाहिस..
गालावर सुकून गेलं चंद्रपाणी..
**********************************
डोळे गच्च मिटुन
सगळी कवाडं बंद करुन बसले
तरी श्वासात दरवळत होताच चंद्र...
**********************************
चंद्राळलेलं आभाळ नाही मिळालं तुला
पण तोवर माझ्यात रुजला होता
तुझा चंद्राचा हट्ट...
**********************************
निघुन जातात तुझ्यासारख्याच
नि:शब्द शांततेत
हल्ली चाहुली उठवत नाहीत चंदेरी वादळं...
mee ni:shabd
Thanks.. :-)
sundar..
Thank you Rohan.. :-)
जीवघेणा प्रकार आहे हा..
काही वाचताना किंवा अनुभवताना, प्रयत्न करत असतो.. निखळ मनाने ते आत घेण्याचा.. माझ्या गतानुभवांची त्यामधे सरमिसळ न होवू देता.. खूप वेळा फसलायं माझा हा प्रयत्न.. आजही तसंच झालंय काहीसं. जस्संच्या तसं वारं अंगावरून जातंय आज.. परत..
राऊळ साऊल,
मला वाटतं निखळ मनाने असं काही आत घेतच नसतो आपण एका ठराविक वयानंतर.. आपल्याला आलेल्या आयुष्याच्या अनुभवावरच पुढंचं तोलत असतो. त्यातूनही एखादी नवी अनुभूती निखळ मन अजूनही अस्तित्वात असल्याचा अनुभव देऊ शकते. पण ही कविता आपल्या आयुष्याचा भाग आहे असं जेव्हा जाणवतं ना एखाद्या कवितेबद्दल तेव्हा तिला आपल्या मनात कायमचं स्थान मिळून जातं.. :-)
तेही खरंच.. तशात काही गोष्टी खूप जीवाच्या असतात.. आणि त्या जश्याच्या तशा समोर आल्या तर मग आपल्या हातात काहीच रहात नाही.. त्यामुळे या अनुभवाला मी काही बोल नाही लावू शकत.
पण स्वतःचे अनुभव बाजूला ठेऊन निखळ मनाने वाचण्याचा प्रयत्न करण्याची ही सवय मला जीएंच 'सांजशकुन' वाचल्यापासून लागलीय बहुदा.. वाटतं कि जे वाचतोय त्याचा आपल्यालाही नेमका तोच अनुभव यावा ज्या अनुभूतीतून लेखकाने ती निर्मीती केलीय, तरच त्याला वाचक म्हणून न्याय देवू शकतो आपण.. आणि न्याय देण्यापेक्षाही वाचकाला त्यातून नवी अनुभूती येऊन त्याचं evolution व्हायला हवं.. त्या निर्मीतीला आपल्याच गतानुभवांतून तोलायचं म्हटलं तर मग वाचक त्यातून स्वतःचीच एक वेगळी निर्मीती करतोय असं म्हणावं लागेल... like overriding the genuine framework with your own ideas which can be irrelevant at times..
पण हे असंही आहे की प्रत्येकाचं स्वतःच एक unique metal असतं आणि कुठलाही तरंग उठला तर ते त्याच्याच एका unique frequency-ने vibrate होईल.. so, प्रत्येकाला वेगळी अनुभूती येत असेल वाचताना.. आणि हे पण सही वाटतं मला कधी कधी.. वेगवेगळे तरंग आणि वेगवेगळे अनुभव.. infinite possibilities of creations.. :-)
खरंतर हे पूर्णपणे असंही नाही आणि तसंही नाही.. like life, it has many dimensions.. so, no one can conclude it.. म्हणून वाटतं की एवढा उहापोह करण्यापेक्षा पावसाच्या सरी अंगावर घेत रहाव्यात फक्त.. मनसोक्त.. मग, दारातल्या मोरांची पिसं दरीतल्या धुक्यात तरंगत राहतीलंच.. :-)
sorry for this essay-writing on your blog, पण जी लोक लेखक नसतात त्यांना आपली हौस अशीच भागवून घ्यावी लागते :-P
लेखकाने कितीही चांगली वातावरण निर्मिती केली असली तरी जोवर लेखक स्वतः सांगत नाही की त्याला नक्की काय म्हणायचं/मांडायचं आहे तोवर आपली कोणतीही अनुभूती ही एक शक्यताच राहते. आणि खरा लेखक कधी असं सांगत नाही हेही तितकच खरं. and thats why "infinite possibilities of creation" principle always remains there. Its not the final conclusion either but infinite possibilities make the creation kinda eternal.. :-)
And after reading your comment I can surely say, you are no less than a writer man.. :-)
keep writing..!
Thank you for words of admiration and encouragement.. :-) ...but seriously, I can never call myself a writer. मी वर्षा-दोन-वर्षातून एकदा स्वतंत्रपणे लिहितो काहितरी.. तेही खुपच घायाळ करणारा असा एखादा वार झालाच तर. बाकी वाचक म्हणून मी जे काही आणि जसं काही वाचलंय त्याबद्द्ल बरंच लिहू शकतो. आणि कुठल्याही भावलेल्या गोष्टीबद्दल तासंतास बोलू शकतो.. सही वाटत ते.. so, काही नाही तर एक चांगला वाचक म्हनू शकतो मी स्वतःला.. :-)
तू बाकी खूपच छान लिहितेस हं.. आणि कधी कधी तर अगदी मनातलं.. कौतुक वाटतं तुझं मला फार..! :-)
No doubt you are a good reader.. :-) आणि भावलेल्या गोष्टींबद्दल तासन् तास बोलणं.. there is nothing like that..किशोरपासून रशीद खां पर्यंत.. गुलजार पासून स्वानंद किरकीरेंपर्यंत.. पु लं पासून किरण नगरकरांपर्यंत.. आणि बर्गमनपासून अलेक्झांड्रो इनारिट्टू पर्यंत.. रात्र रात्र अशीच कौतुक करत काढणं is heaven..
Greaat read thanks