तुझ्या एका चंद्रासाठी
माझं अख्खं आभाळ गहाण टाकलेलं मी तेव्हा..
माझ्या असंख्य चांदण्यांपेक्षा,
मला महत्वाचा होता तुझा कवडसा..
आणि तोसुद्धा मला तुझ्याचसोबत वाटून घ्यायला हवा असायचा..
त्याला पूर्णत्व यायचंच नाही त्याच्याशिवाय माझ्यालेखी..
पण आता असं राहिलं नाही..
आधी मुद्दाम आणि आता सवयीनेच हे टाळतेय..
हल्ली माझ्या आभाळातली छोटी मोठी चांदणी पण
अपार कौतुकाने न्याहाळत असते मी..
शांतपणे त्यांचे कवडसे मुरवून घेत असते स्वतःमध्येच..
आणि हे सगळं होताना स्वतःमधले बदल पहात रहाते
त्रयस्थपणे...
आता तर हे इतकं सराईतपणे होतय की
कधी काळी मला चंद्राचं असलं वेड होतं हे
चांदण्याच सांगत असतात मला अधूनमधून..
पण आता सवय झालीये..
खरच सवय झालीये..
मान्य आहे तुझ्यासोबत असताना कवडसे जसे लखलखायचे
तसे आता नाही चमकत..
पण आता येणारा काळोखही फारसा अंधारा नसतो..
ते लखलखणं आणि त्या काळोखी गर्तांतले हेलकावे झेपेनासे झालेत..
माझ्या चुकार चांदण्यांचे किरण घेवून चालत असते मी आता..
खरंच..
तुझ्या एका चंद्रासाठी
अख्खं आभाळ गहाण टाकायचं वय मागे पडलंय आता...
माझं अख्खं आभाळ गहाण टाकलेलं मी तेव्हा..
माझ्या असंख्य चांदण्यांपेक्षा,
मला महत्वाचा होता तुझा कवडसा..
आणि तोसुद्धा मला तुझ्याचसोबत वाटून घ्यायला हवा असायचा..
त्याला पूर्णत्व यायचंच नाही त्याच्याशिवाय माझ्यालेखी..
पण आता असं राहिलं नाही..
आधी मुद्दाम आणि आता सवयीनेच हे टाळतेय..
हल्ली माझ्या आभाळातली छोटी मोठी चांदणी पण
अपार कौतुकाने न्याहाळत असते मी..
शांतपणे त्यांचे कवडसे मुरवून घेत असते स्वतःमध्येच..
आणि हे सगळं होताना स्वतःमधले बदल पहात रहाते
त्रयस्थपणे...
आता तर हे इतकं सराईतपणे होतय की
कधी काळी मला चंद्राचं असलं वेड होतं हे
चांदण्याच सांगत असतात मला अधूनमधून..
पण आता सवय झालीये..
खरच सवय झालीये..
मान्य आहे तुझ्यासोबत असताना कवडसे जसे लखलखायचे
तसे आता नाही चमकत..
पण आता येणारा काळोखही फारसा अंधारा नसतो..
ते लखलखणं आणि त्या काळोखी गर्तांतले हेलकावे झेपेनासे झालेत..
माझ्या चुकार चांदण्यांचे किरण घेवून चालत असते मी आता..
खरंच..
तुझ्या एका चंद्रासाठी
अख्खं आभाळ गहाण टाकायचं वय मागे पडलंय आता...
फिरून परत इथेच आलोय मी आज.. चांदण्यांच्या सावलीत. आभाळात अलगद तरंगणारे नजर सुखावणारे चांदण्यांचे तळे.. आणि कधी त्यातूनच शांतपणे वाहणारे दुःखकिरणांचे झरे.. डोळे दिपवून अंधाऱ्या आणणारं लखलखणं नाहीच आता त्यात. म्हणून मग नकोसा झालेला जीव इथेच विसावतोय.. या औदुंबरी मायेच्या पारंबीपदरांखाली. आरती प्रभूंच्या कवितेत जशी काचणाऱ्या आसवांना चांदणीची पेंग येते ना.. अगदी तसंच होतंय बघ आज, पापण्यांच्या काठावर खूप दिवसांपासून तरंगलेल्या या थेंबांचं.. आणि अशात ग्रेसची खूप आठवण येतेय आज..
वैराण दिशांचा जोग,
चांदणे नदीच्या पाण्यावर अंथरलेले..
तव हात उडोनी जाती..
तव हात उडोनी जाती..
जे ओल फुटाया तुच स्तनांशी धरले.
तव हात उडोनी जाती..
जे ओल फुटाया तुच स्तनांशी धरले.
वैराण दिशांचा जोग..
चांदणे नदीच्या पाण्यावर अंथरलेले..
शिल्पांत खंड स्मरणाचा,
निःसंग कशाला क्षितीज जोडीशी भगवे?
हे जरी मिटे प्राणाने,
सांतातुन अवघे अस्त घेऊनी उगवे..
हे जरी मिटे प्राणाने,
सांतातून अवघे अस्त घेऊनी उगवे..
वैराण दिशांचा जोग,
चांदणे नदीच्या पाण्यावर अंथरलेले..
तव हात उडोनी जाती..
- ग्रेस
* * *
ओह् .. वैतागलो राव तुझ्या ब्लॉगवर कमेंट्स करून करून. घाम फुटला पार तरी सुटेना. अधनं मधनं तर तुझं काही वाचताना मलाच क्रिएटीव्हीटीचे झटके येतात.. स्ट्रोक्स! :-) ..व्यसन यालाच म्हणतात कायनूं! आणि आता तर हे मला स्वतःलाही उलगडून सांगण्याच्या पलीकडे गेलंय सगळं. मोगऱ्याच्या आणि मातीच्या वासाचं येड लागतं ना.. तसं झालंय अगदी! Do you think I'm biased while praising? I think– Yes, I am! But also, I'm not a critic.. ;-) ..and not as a mere follower or admirer, but I come to visit as a friend.. to share gardens of flowers and ruins of burnt castles as well.. to remember something important and to forget some fouls.. to listen your songs and to sing some of mine.. I am a dreamer.. standing under the stars at this blue lake of yours.. where softly blowing wind carries their whispers to me.. I'm waiting for those lost songbirds of this wild heart to return.. Robins!.. and if..
If I shouldn't be alive
When the Robins come,
Give the one in Red Cravat,
A Memorial crumb.
If I couldn't thank you,
Being fast asleep,
You will know I'm trying
With my Granite lip!
– Emily Dickinson
Thanks a lot Anil.. :-)