मेरा कुछ सामान ...
खूप छान धुकं असायचं तेव्हा आपल्यामध्ये..
नाव, गाव, रंग, रुप यातल्या कशाचाच परिचय नसताना
फक्त एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणांमुळे दाटलेलं..
आश्वासक.. हवहवसं.. गुलाबी..
गहिरं, अधीरं.. लोभस..
तुझेपणाच्या, माझेपणाच्या
सगळ्या कक्षा सामावुन घेणारं..
ओळखीचे चकवे दाखवत हळुच,
अनोळखी होवुन जाणारं..
समजतयं असं वाटेपर्यंत,
अवघड होवुन बसणारं..
अज्ञाताच्या सोबतीने सुरु केलेला स्वतःचा शोध,
स्वतःची होत जाणारी नविनच ओळख..
तू त्या शोधात फक्त सोबत होतास..
किंवा निव्वळ तू अस्तित्वात असल्याची जाणिव..
तुही कदाचित नव्याने पाहिलंस स्वतःला
माझ्या अस्तित्वाच्या जाणिवेची सोबत घेवुन..
मग कोणत्या क्षणी महत्वाचा झाला तुझा परिचय स्वतःच्या ओळखीपेक्षा?
का जंग जंग पछाडले त्या परिचयासाठी?
ह्म्म...
शेवटी एकदाचा झाला
तुझा माझा परिचय..
पण त्याच क्षणी वितळुन गेलं ते धुकं..
नविन सापडु शकले असते असे काही चेहरे,
पुन्हा हरवुन गेले त्या धुक्यासोबत..
अजुनही वाट चालतोय आपण एकमेकांच्या सोबतीने..
पण आता काही हुरहुर नाही..
कसलंही काहुर नाही..
स्वतःविषयी काही नविन शोधही लागत नाही आताशा..
फक्त तुझ्याकडे बघताना कधी कधी वाटतं,
खूप छान धुकं होतं तेव्हा आपल्यामध्ये.....
3 Responses
  1. Anil Says:

    तुझ्या चांदण्या, चंद्र आणि धुकं बघून ऐकून बरंच बोललोय मी.. पण आज परत वाचलं सगळं आणि परत काय काय सुचतंय बघ..

    एका बाजूला 'मी'पण शोधण्याची आणि जपण्याची धडपड, तर दुसर्‍या बाजुने 'मी'पण विसरून समर्पणात विरघळून वितळून जाण्याची ओढ, यातच जीवाची सगळी घालमेल होत असावी, नाही का? ..हा विचार थोडासा सुफी वाटतोय आता (तसे sufism-चे वेगवेगळे अर्थ जाणवत राहतातच म्हणा).. हेच बघ ना, बरेचसे सुफ़ी कलाम या दोन गोष्टींच्याच तंद्रीत असल्यासारखे वाटतात.. कधी 'मी'पण.. कधी समर्पण.. तर कधी त्यांची सरमिसळ. ..आणि नुसरत-ला ऐकलंच असशील तू.. हे कलाम नुसरत-कडुन ऐकताना खरंच वेडच लागायची वेळ येते.. आह्, आफ़त!.. जीव पिळवटून टाकतो हा माणूस.. he simply loses his existence while performing and so makes us to lose ours as well.. 'Divine'! .. there's no other word i can think of for him. trance-मधे जाणं म्हणजे काय असू शकतं याची या माणसाने जाणीव करून दिलीय असं वाटतं.. आहाहा, जी करता हैं कि उनके गायें हर इक लफ़्ज पे अपनी जान छिड़कता रहूं बस्सं. ..आणि वरून, काय लिहितात यार हे सुफ़ी poets!.. त्यातल्या त्यात आमीर खुस्रो आणि बुल्ले शाह.. हेच बघ ना.. किती साधं लिहीलंय, पण काय कातिल असर आहे याचा..

    मोहे अपने ही रंग में रंग लें निज़ाम,
    तू हैं साहिब मोरा मेहबूब-ए-इलाहि..

    रंग दे रंगरेज ऐसा रंग दे,
    मेरा हर एक रंग तेरा रंग दे..

    ऐसा रंग रंग दो रंग नहीं छुटें,
    धोबीयाँ धोंयें चाहें सारी उमरीयाँ..

    रंग कि रंगाई जो तू मांगे,
    मोरा जौबन गिरवीं रख लें निज़ाम..

    ये मोरी चुनरीयां पी की पगरीयाँ,
    मोहे दोनों बसंती रंग दे निज़ाम..

    हे असं, जणू सगळं अस्तीत्वच विरघळून जावं..
    तर कधी असं, कि स्वतःला अगदी घुसळून टाकावं..

    पढ़ पढ़ इल्म हज़ार किताबां,
    कदे अपने आप नूं पढ़या नईं

    जा जा वढ़दैँ मंदिर मसीती,
    कदे मन अपने आप विच वढ़या नईं

    ऐवेँ लड़दा ऐं शैतान दे नाल बन्देया,
    कदी नफ़्स अपनी नाल लड़या नईं

    आखे पीर बुल्ले शाह आसमानी फढ़ना ऐं,
    जेड़ा मन विच वसदा ए ओनूं फढ़या नईं

    जीवघेणा प्रकार आहे सगळा..

    बघ आता.. कुठंच्या कुठं गेलो मी बोलता बोलता.. डोक्यावर परीणाम झालाय बहुदा नुसरत ऐकून ऐकून.. पण तरीही, धुक्याच्या आणि चांदण्यांच्या अनुषंघाच्या ओघानेच वाहत असावं हे सगळं.. आणि चालायचच, येडं व्हावं माणसानं अधनं-मधनं.. :-) .. बाकी काय असतं नाहीतरी..


  2. अनिल, आता माझ्या पोस्ट पेक्षा मला ही कमेंटच भारी वाटली म्हणा.. :-) बाकी सुफीजम आणि नुसरत बद्दल १००% सहमत.. आणि बुल्ले शाह, वारिस शाह हे फक्त अमृता प्रीतम कडून माहिती. बाकी तुम्हाला त्यांचीही बरीच माहिती दिसतेय. भारीच.. आणि दोन्ही कविता, "वाह, क्या बात है.." अशाच..


  3. Anil Says:

    श्वेता, ऐसा मत बोल यार.. बड़ी शरम आती हैं मुझे कभी कभी. अरे हम तो बस कायल है जो कातिल मिलें तो सजदा कर लेते है. अब इसमें मेरी ऐसी कुछ खास करामात तो है नहीं! ;-) .. आणि बाकी, एकंदरीत माझं वाचन तसं खूपच कमी आहे. बरंचसं सुफ़ी जे ऐकलंय ते नुसरत-कडुनच आणि थोडंफार sain zahoor-कडुन (हा एक मातीतून उगवून आलेला माणूस आहे.. जमलं तर ऐक कधी). मनाची वाट मोकळी करून देतात बघ ही लोक.. आणि तूही.. बाकी मग मी बडबडत राहतो आपला.. माझ्या बोलण्यातले शब्द आणि त्यांची मांडणीही माझी नसावी बर्‍याचदा. या सगळ्यात विरघळणारा जीवच काय तो माझा. तू बाकी जास्त फेरबदल न करता जीवातून मांडतेस बरंचसं.. कशाला सिद्धांताचं रूप नको द्यायला आणि कशाला नको तितका बोल नको लावायला असं काहीसं.. ते ओळखीचे चकवे.. अज्ञाताची सोबत.. अस्तित्वाच्या जाणिवा.. परिचयाचा हट्ट.. ते धुकं.. चांदणं.. काहूर.. हुरहुर.. उद पाणि मीठ काजळ (हे आरती-च आहे बरं का!). .. हाह्!, चला बावां, मी परत सुरू व्हायच्या आत आवरतं घेतो, आत्ताच, लग्गेच! :-)