आयुष्यात काही क्षण सुखाचे असतात, काही दु:खाचे, काही रागाचे, लोभाचे.. पण काही क्षण मात्र असे येतात की त्यावेळी त्या भावनेपेक्षा काळिज हलवुन टाकणारी त्या भावनेची तीव्रताच मनात घर करुन रहाते.. अगदी कित्येक वर्षांनी जरी आठवले ते क्षण तरी ते तितकेच तीव्र असतात. असं म्हणतात की काळाबरोबर सगळे रंग फिकट होत जातात. पण काही रंगांचे फटकारे मात्र सूर घोटुन अधिक अस्सल व्हावे तसे अधिकच चमकदार होत रहातात....
--------------------------------------------------------------------------------
३रीत असताना शहिद भगतसिंग चित्रपट पाहिला तेव्हा त्यांच्या फाशीच्या वेळेस अक्षरशः धाय मोकलुन रडलेली ती. आणि आईने कितीही समजावलं तरी इंग्रज हा देश सोडुन गेलेत आता यावर कितीतरी दिवस तिचा विश्वास बसत नव्हता.
-------------------------------------------------------------------------------
ती बाबांची वाट बघत शाळेबाहेर उभी होती. समोरुन एक गाडी चाललेली. त्यावरचं बाळ तिच्याकडे आणि ती त्या बाळाकडे बराच वेळची पहात होते. आणि नजरेआड जायची वेळ आली तेव्हा अचानकच ते बाळ खूप गोड हसलं आणि तिला बाय्-बाय करायला हात हलवले त्याने. आज इतक्या वर्षांनंतरही ते बाळ जसंच्या तसं नजरेसमोर येतं तिच्या.

१३-१४ वर्षांची असताना कधीतरी एका हिवाळी रात्री कोणत्यातरी नातेवाइकाकडे सुट्टी घालवताना "दिल ढूंढता है फिर वोही.." ऐकलं होतं. काय समजलं त्यातलं? माहित नाही. पण एक प्रश्नही न विचारता ती आता आयुष्यभरासाठी ते लिहिणार्या माणसाच्या प्रेमात पडली होती.
---------------------------------------------------------------------------------
८-९ त असताना तिच्या बिल्डींगमधल्या बांधकामाच्या इथे मांजरीची २ पिल्लं आलेली. ती तासन् तास त्यांच्याशी बोलत बसायची. त्यांना तिची भाषा सगळीच्या सगळी समजते यावर विश्वास होता तिचा. खरतर, त्यावेळेला सगळं जगच गप्पा मारायचं तिच्याशी. हल्ली खूप शांतता असते. तिनेच ऐकायचं बंद केलय का?

हॉस्टेलवर तशी शांतताच होती सेमिस्टर संपल्यामुळे. तिला अजुन घरी जायला २ दिवस होते.
रात्री वळवाचा पाऊस आला. आता असह्य होतं हे म्हणजे. रात्री २ ला पावसात चिंब चिंब भिजत उभी होती ती. आणि त्या धुवांधार पावसात तिला स्पष्ट ऐकु आले सूर. आये ना बालम, का करु सजनी..
----------------------------------------------------------------------------------
फुलवेडीच ती.. सह्याद्रीच्या कुठल्यातरी घाटात हुंदडताना तिने अशीच खूप सारी फुलं गोळा केली होती. त्या गुच्छावर एक फुलपाखरु येवुन बसलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. तरी स्तब्धपणे बघत राहिली त्याच्याकडे ते उडुन जाईपर्यंत..

त्यांच्या दाटलेल्या आठवणीने कित्येकदा ती उशीत तोंड खूपसुन रडली होती. आज खूप वर्षांनी ते सगळे चॅटवर एकत्र भेटले. तिला खूप काही बोलायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की तुम्ही सगळे खूप खूप काही आहात माझ्यासाठी. मी कधीही व्यक्त करु शकेन त्याहीपेक्षा जास्त. पण नाही बोलु शकली काहीच. त्या रात्री रडताना पहिल्यांदा परकेपणा दाटलेला.
-----------------------------------------------------------------------------------
रोज संध्याकाळी ऑफिसमधुन घरी येताना त्या फुलवालीकडुन २ रु. ची फुलं घ्यायची ती देवपुजेला. फुलवाली एकदा म्हणाली, "बाई गं, मी कदी कोनालाच २ रु. ची फुलं देत नाही. पन तुला न्हायी म्हनायला जमतच नाही बघ." कशानेतरी हवेवर तरंगल्यासरखं झालं तिला काही काळ नक्कीच...

jamlay.. :)
:-) Thanks Prajakta..
awesome!.. खूप मनात होतं माझ्या कि कुणीतरी असं काही इतक्या जीवाने मांडावं.. बरं केलंस. सगळ्यांचेच असे अनेक अनुभव असावेत.. पण खरंच, हे सुख-दु:खांचे थेंब जपून ठेवायला आणि ते असे ओंजळ उघडून दाखवायला एक संवेदनशील मन लागतं. ..काय माहित इतकं कसं, पण खूपच भरून येतंय हे वाचताना.. सगळं जस्संच्या तस्सं समोर उभं केलंयस तू म्हणुनच असेल बघ! ..i'm grateful!
तेच तर ना अनिल, जस्संच्या तस्सं कधीच समोर उभं रहात नाही... अंधुक अंधुक वाटतं सगळं, दर वेळी नवीनच दिसतं म्हणूनच नाव कॅलिडोस्कोप.. :-)
खरंय, प्रतिमा बदलत राहतातच.. कधी धुक्याचे पदर पडतात मधे, तर कधी लख्ख चमकून जातं काहीतरी.. shades बदलतात.. रंग बदलतात.. मग त्या त्या वेळी त्या त्या रंगात रंगून जावं अन् काय.. :-) ..हे वाचताना मनावर जे उमटलं ते जिवंत वाटलं खूप, अगदी समोर दिसल्यासारखं .. आणि मग मी थोडा senti पण झालेलो :-( ..तुझं 'पत्ता' हे post वाचताना तेही असंच नजरेसमोर उभं राहिलेलं.. like a painting..!
:-)
एकदम मस्त वाटलं हे वाचून. छोट्या छोट्या प्रसंगाच्या आठवणी का राहतात असं काही वेळा मी पण स्वतःलाच विचारात असते. मस्त आहे हे मनोगत :)
Thanks Aparna.. :-)