मेरा कुछ सामान ...
तुला न पडलेली माझी स्वप्नं खुडून टाकताना,
कानात घुमत राहते तू न मारलेली हाक..
आणि तू मला न लिहिलेली पत्र फाडून टाकताना,
डोक्यात रुंजी घालते तुला न आलेली आठवण..
बंद पापण्यांआड उतू चाललेली तुझी स्वप्नं,
आणि शिवलेल्या ओठांमागे अडवून धरलेली साद घेऊन मी चालतेय,
तुझी सोबत न मिळालेल्या या वाटेवरुन..
पण तरीही मनात जपून ठेवेन मी कायम,
तू न केलेलं प्रेम..
6 Responses
  1. Anonymous Says:

    खुप छान.....बंद पापण्यांआड उतू चाललेली तुझी स्वप्नं,
    आणि शिवलेल्या ओठांमागे अडवून धरलेली साद घेऊन मी चालतेय,...
    आपण नेहमी स्वप्नातच राहतो ..
    आणि जगतो मात्र... विपरीत...
    इमोशनल केलत तुम्ही...



  2. Anonymous Says:

    ईश्वरी काव्यात्म अनुभव ...




  3. Ajit Says:

    ऐ कबीरा मान जा...