May
15
किती भरभर बदलत जातात शहरं..
अनोळखी होत जातात ..
झपाट्याने बदलण्याचा काळच असतो एकेक..
आणि मग नाहीच थोपवता येत आपल्याला काही..
हरवून जातात जुनी आपुलकीची ठिकाणं..
उन्मळून पडतात मुळापासून रुजलेल्या आठवणींचे वृक्ष..
नव्या गर्दीत नाहीसे होतात आपले सरावाचे रस्ते..
आणि जपून ठेवलेल्या खाणाखुणा कधी पडल्या हे तर कळतही नाही..
.
.
बघता बघता बदललं शहर..
अनोळखी झालं..
जिथं कधी काळी माझं अवघं विश्व नांदायचं..
हरवलं..
तुझ्या नजरेतलं माझं शहर..
अनोळखी होत जातात ..
झपाट्याने बदलण्याचा काळच असतो एकेक..
आणि मग नाहीच थोपवता येत आपल्याला काही..
हरवून जातात जुनी आपुलकीची ठिकाणं..
उन्मळून पडतात मुळापासून रुजलेल्या आठवणींचे वृक्ष..
नव्या गर्दीत नाहीसे होतात आपले सरावाचे रस्ते..
आणि जपून ठेवलेल्या खाणाखुणा कधी पडल्या हे तर कळतही नाही..
.
.
बघता बघता बदललं शहर..
अनोळखी झालं..
जिथं कधी काळी माझं अवघं विश्व नांदायचं..
हरवलं..
तुझ्या नजरेतलं माझं शहर..
ग्रेट निव्वळ अप्रतिम!
( तू आहेस कुठे आजकाल? फेसबुक संन्यास घेतलास काय?)
Yep.. गेल्या ऑगस्ट पासून बंदच होतं फेसबूक मग ओपन करायची गरजच वाटेना म्हणून डिलीट केलं डिसेंबर मध्ये. आणि म्हणूनच तुझा ब्लॉग अचानकपणे सापडल्याचा इतका आनंद झाला. :) Keep it up. Its always great to read you.
Too Good...
Thanks Indradhanu.. :)
khup chan sis.. :)
Amrita,
Thanks Love.. :)
Khup Sunder... Apratim...
Thanks Rohan.. :-)
Khup chaan....
harawalelya khuna jyaprakare hurhur laavatat te khup nemakya shabdat pakadalay.....
Thanks.
Yea.. Harvalele dole jast hurhur lawatat. :-)