Feb
24
इतरांच्या मनाचा विचारच न करणारी
तू नसशील आत्ममग्न स्वार्थी...
आणि तू आताही नाहीयेस,
त्याच्यासाठी आयुष्य वेचशील अशी त्यागाची मूर्ती..
तुझ्यात शोधेल तो तुझीच रुपं,
जशी त्याला दिसायला हवी आहेत तशी..
पण हा साक्षात्कार होईपर्यंत तग धरता येईल का तुला..?
विदिर्ण होऊन जातो गं आत्मा.. शब्दांचे वार व्हायला लागले की,
सावरायची सवडही न देता..
म्हणून म्हणतेय,
सावध हो...
कितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,
शब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,
तरी त्या वाटेला नको जाऊ ..
काहीही हो, पण नको होऊ,
कोण्या लेखकाची कल्पना..
कोण्या कवीची कविता..
तू नसशील आत्ममग्न स्वार्थी...
आणि तू आताही नाहीयेस,
त्याच्यासाठी आयुष्य वेचशील अशी त्यागाची मूर्ती..
तुझ्यात शोधेल तो तुझीच रुपं,
जशी त्याला दिसायला हवी आहेत तशी..
पण हा साक्षात्कार होईपर्यंत तग धरता येईल का तुला..?
विदिर्ण होऊन जातो गं आत्मा.. शब्दांचे वार व्हायला लागले की,
सावरायची सवडही न देता..
म्हणून म्हणतेय,
सावध हो...
कितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,
शब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,
तरी त्या वाटेला नको जाऊ ..
काहीही हो, पण नको होऊ,
कोण्या लेखकाची कल्पना..
कोण्या कवीची कविता..
Captivity of Negativity. [From Prison Break :P]
OMG Anonymous.. :-D I tried to watch prison break back in college but didnt finish.. But thanks for comment.. :-)
"कितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,
शब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,
तरी त्या वाटेला नको जाऊ .."
वाट सुंदर असेलही कदाचित पण मुक्कामी पोहचल्यावर मात्र त्रासच असतो का ?
लिना,
मुक्काम तर अजून माहितीच नाही पण सुंदर दिसणार्या वाटेवर असुंदर वळणही येणार हे नक्कीच ना.. कोणतीही वाट सगळीच्या सगळी सुंदर नसतेच..
सुंदर खूप छान आहे कविता! हे वाचून मला व.पु ची एक कथा आठवली "फ़्यट्सी एक प्रेयसी" कदाचित वाचली अशिल
केदार,
थॅक्स.. :-)
नाही वाचलेली मी ती कथा पण मला वाटतं हल्लीच गेल्या वर्षी वगैरे कोणत्यातरी चित्रपटासंदर्भात चर्चेत होती का ती? असो, तसंही वपुंच्या सगळ्या कथा नंतर नंतर सारख्याच वाटायला लागतात.. :-D Sorry.. no offense..
खूप छान लिहिताय. वरचेवर लिहित चला.
Thanks a lot Vijay.. :-)
खुप आवडल लिखाण... शुभेच्छा
http://aishwaryasmruti.blogspot.in/?m=1
थि
This is my blog...
Wud be very happy if u share ur moment on it...
Thanks a lot Shripad.. Will have a look at the link.. :-)