वळणावळणावर चकवा देत चाललेल्या वाटेला,
भास होत रहातात..
तू सोबत असल्याचे..
आणि मला जाणिव, ते भासच असल्याची..
पण अपेक्षा नाही त्याचीही..
फुलून दरवळणार्या समजूतदारपणाच्या,
मुळाशी गाडलेले असतात...
न पुरवले गेलेले हट्ट..
अर्धवट सोडलेली स्वप्नं..
पण दु:ख नाही त्याचेही...
एका पारड्यात चूका
आणि एकात स्वप्न घेऊन
चालत रहाते..
आताशा बर्याच तटस्थपणे..
कुठल्याच दु:खाने आजकाल,
डोळे भरुन येत नाहीत..
आणि विनाकारण वहायला लागले तर,
थांबायचं नाव घेत नाहीत..
जी काही खंत आहे, ती याचीच...
भास होत रहातात..
तू सोबत असल्याचे..
आणि मला जाणिव, ते भासच असल्याची..
पण अपेक्षा नाही त्याचीही..
फुलून दरवळणार्या समजूतदारपणाच्या,
मुळाशी गाडलेले असतात...
न पुरवले गेलेले हट्ट..
अर्धवट सोडलेली स्वप्नं..
पण दु:ख नाही त्याचेही...
एका पारड्यात चूका
आणि एकात स्वप्न घेऊन
चालत रहाते..
आताशा बर्याच तटस्थपणे..
कुठल्याच दु:खाने आजकाल,
डोळे भरुन येत नाहीत..
आणि विनाकारण वहायला लागले तर,
थांबायचं नाव घेत नाहीत..
जी काही खंत आहे, ती याचीच...
kharach brobal bolalay
thambayala vel nahi.
Dadu,
Comment samajali nahi..
आयुष्याचं पटल हे असं मुक्त मोकळ निरव आभाळ असूनही उडता येत नसेल तर.. आयुष्यातल्या गोष्टींचं ओझंही झालंयच, पण त्या वजनामुळे उडता येत नाहीये असही नाही आणि पंखच नाहीयेत अशातलाही भाग नाहीच.. but this Anguish my Friend!
Too happy Time dissolves itself
And leaves no remnant by—
'Tis Anguish not a Feather hath
Or too much weight to Fly—
फुलून दरवळणारा समजूतदारपणा ...
खूपच सुंदरपणे हे मांडलय. It can not be expressed more appropriately. कविता वाचून डोळ्यांत पाणी आलं.... उगाचच..
Mi... Majha....
:-)
फुलून दरवळणार्या समजूतदारपणाच्या,
मुळाशी गाडलेले असतात...
न पुरवले गेलेले हट्ट..
अर्धवट सोडलेली स्वप्नं..
पण दु:ख नाही त्याचेही... sunder
Thanks Rohan.. :-)