मेरा कुछ सामान ...
सरगम अडली, त्या वळणावर..
वीणा रुसली, त्या वळणावर..

ओढ कशाची, ओढुन नेते?
स्वप्ने फुलली, त्या वळणावर..

मोहवणारी विषवेलींची
नक्षी सजली, त्या वळणावर..

तू ही गर्दीमधला झाला,
मैत्री हरली, त्या वळणावर..

तार्‍यांवाचुन कोरी रजनी,
हिरमुसलेली, त्या वळणावर..

तू जाताना वळला नाही,
वळणे चुकली, त्या वळणावर..
5 Responses
  1. Anil Says:

    आह्‌!!!!!!, कतल! :-) रिदम घेऊनच आलीय बरं! अशा लिरिकल फिट्स येताना कसलं भारी वाटत असेल ना? प्रत्येक 'वळणावर' तबल्याची जीवाचा ठोका चुकविणारी हलकीशी थाप पडावी ना.. तशी दाद बसली माझी तर. आणि लिरिक्सबद्दल तर काही बोलायलाच नको.. वळणावळणांच्या वाटेवरून जातानाची फुललेली रुसलेली गाणी, स्वप्नं, नक्षी अन्‌ चुकलेली वळणं नजरेसमोरून अशी सरसर सरकून गेली वाचताना. आठवणी येतात.. मग कधी मनाला उभारी, तर कधी मलूलपणा.. मग विसरायला होतं सगळं.. प्रत्येकाचंच मन किती काय काय घेऊन येत असतं ना पुन्हा पुन्हा.. विसरल्यासारखं होतं ते नंतर.. ह्म्म.. ते सगळंच लक्षात ठेवणारं नाही पण त्याचा count ठेवणारं असायला पाहीजे कुणीतरी.. कधी स्वतःलाच final sum सांगायची वेळ आली तर! :-) नाही का? चला, ती कविता आठवूया या वळणावर.. Emily Dickinson-ने केलेली. आहाहा.. जीवाचं अगदी amazing लिहीते Emily! प्रेमात पडलो राव मी या बाईच्या.. ah'.. sweetheart! :-) .. असं काहीतरी गुणगुणतेय ती..

    It's all I have to bring today –
    This, and my heart beside –
    This, and my heart, and all the fields –
    And all the meadows wide –
    Be sure you count – should I forget
    Some one the sum could tell –
    This, and my heart, and all the Bees
    Which in the Clover dwell.

    – Emily Dickinson



  2. Anil Says:


    ह्म्म.....

    ummm ..can't say if it's better than prior one or not, but this new template is good! -especially the fonts and text color! ..and even if shades of purple are not used effectively, it still shows it's character! ..i wonder how many ways one can express this marvellous element.. whatever happens, it always resonates magically.. ah, purple is magical..! :-)

    also, i guess a problem with text background of posts is introduced while changing the template.. for some posts it's white which doesn't look good on light blues.



  3. Anil Says:

    ..few of my favorite ones! :-( ..धडपड, कळोखाची गाणी and first para of PIFF 2013.. i guess that's it. ..and font also looks different there. ..damn, my observation is quite good! ..not that it helps me.. rather, it hurts most of the times these days! :-P