मेरा कुछ सामान ...

माझ्या उदासीला 'तुझ्या नसण्याचं' लेबल लावण्याचे
सोयिस्कर दिवस केव्हाच मागे पडलेत..
अनादी अनंत पसरलेल्या अंधारात उगवावा प्रकाशाचा किरण,
आणि मग तो च काय ते सत्य बनून जावा..
तसा 'एकटेपणा' झळाळलाय,
कारणांच्या पसार्‍यातून..
कुठं काही खुट्ट् झालं की अंधारात लपायची सवय झालेली मनाला..
एखादं सोयिस्कर कारण गुरफटून घेऊन..
आता ह्या झळाळलेपणाला कुठं लपवावं?
'आणखी एक कारण' या कॅटेगिरीत ते बसत नाही..
आणि त्याला जिथे नेऊ तिथल्या कारणांचा फोलपणा याच्या प्रकाशात लपत नाही..
अंधारात लपता येत नाही म्हणून प्रकाशाची चाललेली ही धडपड,
आता असह्य झालीये..
5 Responses




  1. Anil Says:

    ..you said it so well! कारणांचा पसारा आणि फोलपणा खरंच डोक्यात जातो बर्‍याचदा. पण मग उजळून निघालेल्या एकटेपणाचा दाहही सहन होत नाहीच कधी कधी. अशात मग आता, मी ऐकलेली एक गोष्ट सांगू का तुला.. कि, अशा देशांतराच्या पक्ष्यांना जास्त तडफडुनही चालत नसतं, नाहीतर स्वप्नभुमीच्या वाटेवरचा खरा प्रवास सुरू होण्याआधीच त्यांचं सगळं बळं असं स्वप्नांसाठी फक्त तडफडण्यातच संपून जायचं.

    मग शांत एकांतात कधी असंही वाटतं कि.. why put a new address on the same old loneliness.. just be simple.. again. आणि एकटेपणाच्या प्राचीन सत्याने उजळल्याची झळाळी जशी स्वतःपासून लपवता येत नाही तशीच ती दुसर्‍या कुणाला दाखवताही येत नाही (नाहीतर मग तो एकटेपणा कसला, नाही का?).

    by the way, here is a corollary of the theorem..

    उदासीयाँ जो न लाते तो और क्या करते,
    ना जश्न-ए-शोला मनाते तो और क्या करते..
    अंधेरा मांगने आया था रोशनी की भीक,
    हम अपना घर ना जलाते तो और क्या करते..