मेरा कुछ सामान ...
१) जनरलायजेशन.. प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करणं खूप बोजड होईल म्हणून साधारणपणे समान गुणधर्म असलेल्या गोष्टींचा एक गट करायचा.. मग त्यातूनही प्रत्येकाचे काही वेगळे गुणधर्म रहातातच, त्याचा वेगळ्याने अभ्यास करायचा..म्हणजे एकूण एकच. माझं जनरलायजेशन केलेलं मला आवडत नाही. चांगलं म्हटलेलंही आवडत नाही, वाईट म्हटलेलंही.. आवडत नाही म्हणण्यापेक्षा पटत नाही. मी चांगली किंवा वाईट कशी असू शकते? मी माझ्याइतकीच चांगली आणि वाईट आहे, कमी नाही जास्त नाही. पण आता कोणत्याही एका बाजूला जायचं म्हणजे परत जनरलायजेशन आलं. म्हणजे शेवटी सगळंच व्यर्थ.. चांगली, वाईट, स्त्री, पुरुष, हिंदु, मुस्लिम, गरीब, श्रीमंत.. सगळेजण सगळच काही.. शेवटी प्रत्येकाचा स्वतंत्र संच आलाच.. तरीही जनरलायजेशन होऊ शकतं. असं का?
------------------------------------------------------------------------------
२) मायकेल अँजेलो म्हणे वयाच्या ६५ व्या वर्षी प्रेमात पडलेला, त्या काळात त्याने कविता लिहिल्या आणि ती मेल्यावर कधीच नाही लिहिल्या. अमृता-इमरोज ने कधीच एकमेकांना I love you म्हटलं नाही.. हे प्रेम आहे तर मला वाटतं ते काय आहे? ते प्रेमच याची खात्री आहे मला पण मी आयुष्यात इतक्या वेळा पडलेय आणि एकाच वेळी अनेक व्यक्तिंच्या प्रेमात अजूनही असते, मग हे काय आहे? आपुलकी, आकर्षण, जवळिक, सख्य याच्या नक्की कोणत्या प्रमाणातल्या मिश्रणाला प्रेम म्हणतात? आणि कोणतंही प्रमाण असलं तरी प्रत्येकाला एकदातरी ते प्रेमासारखं वाटतं. मग नक्की 'ती' जी सो कॉल्ड उदात्त भावना आहे ती प्रत्येकाला स्पर्श करते का? करत नसेल तर मनात निर्माण झालेल्या कुठल्यातरी थातुरमातुर भावनेलाच मी प्रेम समजते की काय? मला 'तसं' प्रेम कधीच होणार नाही का?
--------------------------------------------------------------------------------
३) मी थर्ड क्लास लेखक आहे. अभिजात १स्ट क्लास, आपल्या पीढीपुरते तरी प्रभाव पाडणारे सेकंड आणि मग राहिलेली रद्दड.. मी.. अभिजातपणाचा दूरदूरपर्यंत पत्ता नाही. मी जो विचार करते तो, थोडाफार विचार करणार्‍या सगळ्यांनीच केलेला असतो, तो सगळ्यांनीच केलेला विचार असला तरी ज्यामुळे तो वाचनीय होतो ती मांडण्याची शैली वगैरे मुळातच नाही आहे. म्हणून मी लिहिलं नाही इतके दिवस. सर्जनशीलतेचा इतका कडकडीत दुष्काळ का?
---------------------------------------------------------------------------------
४) लढत-विव्हळत, प्रत्येक क्षणी नव्याने निराश करणार्‍या आयुष्यासोबत जे काहीतरी करतेय मी ते काय आहे? इतके पैलू की कशालाच न्याय देता येऊ नये. इतकी उत्तरं की कोणताच प्रश्न सुटू नये. इतके मार्ग तरी कोणताच सरळ वाटू नये. कशालाच काही अर्थ नाही असंही वाटावं. त्यात अर्थ भरावा हे ही पटावं. पटूनही काही नीट जमू नये. जमलं तरी समाधान वाट्याला येऊ नये. मरण्याच्या क्षणातच आयुष्य कळत असेल तर......?
5 Responses
  1. एकुणच सगळा लेख छान आहे. पण मुद्दा नंबर २ जास्त भावला, चला म्हणजे असा विचार मानत येणारा मी एकटाच नाही... :)


  2. Thats the beauty... असा विचार मानत येणारा मी एकटाच नाही असं वाटणंदेखिल खूप समाधान देणारं असतं बर्‍याचदा... :-)


  3. Anil Says:

    जनरलायजेशन आणि वर्गीकरण दोन्हीही सत्य-असत्याच्या अभ्यासातून निर्माण झालेल्या संकल्पना वाटतात. बऱ्याच गोष्टींच्या वेगवेगळ्या बाजू या वेगवेगळ्या लोकांसाठी खऱ्या किंवा खोट्या आणि ठळक किंवा धुसर असतात, त्यामुळे कितीही डोकं मारलं तरी सगळ्यांना सामावून घेईल असं जनरलायजेशन किंवा वेगवेगळं करेल असं वर्गीकरण करणं अवघड गोष्ट आहे. त्यामुळे अशात, कलावंतांनी जीवनाची केलेली मांडणी कितीही धुसर असली तरी तीच जिवाला कुठेतरी दिलासा देणारी वाटते. याबाबतीतले ग्रेसचे हे वक्तव्य इथे उल्लेखण्यासारखे आहे.

    कलावंताने केलेली जीवनाची पुनर्निर्मिती हा पुनर्विचार नसतो, तर ती जीवनाची पश्चातापदग्ध पुनर्बांधणी आणि वास्तवकर्मांच्या संदर्भात केलेले सद्य, निर्दय असे आवश्यक परीक्षण असते. अध्यात्मविद्याही जीवनाला पूर्णता देण्यासाठी काहीतरी करीतच असते, पण जीवनाला उल्लंघून, अनुभवून आणि भोगून नव्हे. अनुभवभोगांचे तयार-आयते निष्कर्ष संत, महात्मे, प्रेषित जीवनाच्या तळहातावर ठेवायला टपून बसलेले असतातच. पण त्यामुळे उलट जीवन न जगताच, न भोगताच, कापराच्या वडीप्रमाने उडून जाते. आणि य़ा चमत्कारालाच साक्षात्कार समजून घेण्याची लाचार, बेशरम सवय जीवनाला जडून जाते. त्यामुळे जीवनातील सत्य आणि असत्य म्हणजे - पूर्णता आणि अपूर्णता - यांचा स्वीकार वास्तवाकडून बेताचाच होतो. And, unless clarity (truth) declares it's base shamelessly, then alone it can come to the particular gate where it will be greeted by creative imagination! अस्पष्टता, धुके, संदिग्धता आणि गूधता या सर्व अनुभवसिध्दीच्या मालिका म्हणजे वास्तवाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या कैदाशिणी आहेत असे आपण समजून बसलो आहोत. आणि मग गूढसंमोहनमार्गातील या कैदाशिणींच्या, हडळींच्या नग्ननृत्यापेक्षा वास्तवाच्या शामियान्यात सुरू असलेला नजरबंद अप्सरांचा नाच, it being full of clarity, उत्तमच राहणार! बाकी, अशा shameless clarity-मधून तयार झालेल्या वर्गीकरणांचा लोकांना हा फायदा होतो कि त्याला ताणत चला आणि सर्वांना समाविष्ट करत चला— आणि वरून एक लाचार पस्तुरी असतेच! पण काळे-गोरे, चांगले-वाईट या वर्गीकर्णाच्या पलिकडे माणसाचे आणखी एक ओळखपत्र असते. देहाच्या आतल्या अवयवबांधणीच्या तंतुपेशींचे ओळखपत्र! त्यातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म अदलाबदलीच्या जाणिवांचे ओळखपत्र. But how to read it? या दोन ओळींनी जमते का पहा!

    दबा के आई हैं सीने में कौनसी आँहे ?
    कुछ आज रंग तेरा साँवला लगे हैं मुझे...


    तिने मनात सुखदुःखांचे श्वास असे काही गच्च दाबून धरले आहेत कि, त्या दाबामुळे तिचा रंगच कवीला पालटल्यासारखा वाटतोय! आता अशात इथे, आध्यात्मविद्येतल्या आणि बाकी कुठल्याही 'जाणकारांना', शब्दार्थ, लक्षणार्थ आणि व्यंगार्थ यांचे कोणतेही वर्गीकरण करून हा दुःखाचा पीळ, तरल पोत तपासून पाहता येईल काय?


    आता यावर मी म्हणेल कि.. "ग्रेस, तुम्ही म्हणताय ते बर्‍यापैकी पटण्यासारखं आहे, पण कलावंतांच्या श्रेष्ठत्वाचा मुद्दा मांडण्यासाठी बाकीच्यांना संत-महात्मे-जाणकार ही लेबलं वापरण्याची खरंच गरज होती काय? हे म्हणजे, आजकालचे जे बाबा निर्लज्जपणे 'कसं जगावं' हे लोकांना सरळ सरळ सांगतात, त्यांच्या पंक्तीला संतांना आणून बसवल्यासारखं होतंय. आणि अशा बाबा लोकांचे दाखले देऊन त्यांच्या relatively कलावंताबद्दल बोलणं हे कितपत पटतं तुम्हाला? असो." ..पण यावरही ग्रेस सर मला हेच म्हणाले असते कि, "फक्त माझे शब्द आणि लेबलांवर जाऊ नकोस, मी जे म्हणतोय त्याचा गाभा बघ. बाकी मला आत्ता जे जसं सुचतंय ते तसं मी मांडतोय. ..and even if you don't agree to that, my friend, let's agree to differ!" :-) .. हे पटतं आपल्याला.. let's agree to differ! हा्ह्!.. मला अजून आठवतंय, याच संदर्भात एकदा कलावंत आणि रसिक यांच्या संबंधांबद्दल बोलताना ग्रेसने असं काहीसं विवेचण केलं होतं कि.. "फक्त १००% सोन्याचे दागिने घडू शकत नाहीत, तसे घडवायला गेलं तर ते तुटतात. त्यामुळे त्यात थोडं तांबं मिसळावं लागतं. आणि कलेसाठी तिचे रसिक हेच ते तांबं आहे. त्यामुळे कलावंत आणि रसिक दोघांनीही कलेच्या बाबतीत उगाचच हुरळून न जाता तिच्याशी आपल्याला मनापासून वाटतो तसा खरा संवाद साधावा." आणि हे सांगताना ग्रेसच्या तोंडून निघालेल्या या ओळी..

    नको फुलूस मोगरी पुरासारखे वेडाने..
    घडू जाता तुटू येती खर्‍या सोन्याचे दागिने


  4. Anil Says:

    बाकी, आपल्याला जे वाटतं तसंच काहिसं थोडंफार सगळ्यांनाच वाटत असतं हेही बर्‍यापैकी खरंच. पण जरी अभिजातपणे नाही तरीही, ते जमेल तसं मुक्तपणे व्यक्त करायला उभारी मिळावी म्हणून रवींद्रनाथांचे हे दोन Stray Birds असे वाऱ्यावर भरकटू द्यावेत..

    These paper boats of mine are meant to dance
    on the ripples of hours,
    and not to reach any destination.


    ..and,

    I leave no trace of wings in the air,
    but I am glad I have had my flight.


    Then about love, —it is very difficult task to understand what love really is. I was going through this book called "Rilke on Love and Other Difficulties" where at the beginning, Rilke has mentioned about Socrates's speech of love from Plato's Symposium. So I tried to go through that speech and could see some great thoughts at first, but finally found it little irrelevant to what I lived so far. Also, Socrates plays a lot with words and do trick them in his questioning style, so as a reader I felt like being fooled. Well, there are major chances that I did not understand what he said and so could not connect to his thoughts. But what Rilke has written about love in some of his letters, I could sensibly connect to it and also found it astonishingly relevant to what I have been living. Actually, it is very difficult to speak straight about love and that too without making any major assumptions, without playing with words and without using any particular style or genre of writing. Still, Rilke did dare speak straight about love without even taking any help of his own artistic ways! Although, I still could not understand the later part of his talks from this book as it somehow seems to be going the Socratic way. But, in rest of the letters he has pointed out some very important things about human nature, solitude, relations and love. And even if it doesn't answer all our questions, it certainly provides some profound pointers to our innermost senses and then asks us to be a beginner, always!.. Yes, —"Resolve to be a Beginner!" ..Shweta, I think you would also like to hear it straight from Rilke, so have mailed you his letters from the book. :-)