Times and winds (Bes vakit) - Turkey - 2006 - 111 min
३ लहान मुलं. एकाला आपल्या वडिलांचा खून करायचाय कारण ते त्याच्यापेक्षा त्याच्या लहान भावावर जास्त प्रेम करतात, दुसर्याला आपल्या शाळेतल्या बाई खूप खूप आवडत असतात आणि एक मुलगी, जिच्या घरात नुकतच एक बाळ आलेलं असतं. पौगंडावस्थेत असताना मुलांची मानसिक स्थिती कशी अस्थिर आणि अनप्रेडिक्टेबल असते याचं चित्रण करणारा हा चित्रपट. यांचा सोबती एक अनाथ मुलगा. एका डोंगरावरच्या खेड्यात चाललेलं यांचं आयुष्य, नव्यानेच कळू लागलेल्या काही गोष्टी, भावना.. बदलत जाणार्या ॠतूंसोबत त्यांचं बदलत जाणारं विश्व यांची ही कथा. तीन वेगळी आयुष्यं, म्हटलं तर वेगळी म्हटलं तर जोडलेली, या सगळ्यांच्या आतील भावना आणि वरची वागणूक हे सर्वच पहाण्यासारखं. सगळ्यांचा उत्तम अभिनय. उत्तम सिनेमॅटोग्राफी.
The day I was not born (Das lied in mir) German - 2010 - 92 min
एका लहानश्या मुलीचे आई-वडील हिटलरच्या सैनिकांनी उचलून नेल्यावर, त्या कुटुंबाचे मित्र तिला स्वत:कडेच ठेवून घेतात. तिच्या नातेवाईकांपासून लपवून. अर्थात त्यांचं तिच्यावर खूप प्रेम असतं. हीच मोठेपणी स्विमर होते. एकदा स्पर्धेसाठी जात असताना एका एयरपोर्टवर स्पॅनिश बालगीत ऐकून आपल्याला ते गाणं माहिती असल्याचं तिला जाणवतं. आणि इथून चित्रपटाला सुरुवात होते. तिला सत्य समजण्याची वेळ जवळ आलीये कदाचित, हे जाणवून तिचे वडीलही तिथे येतात आणि मग त्यांच्याकडून जेव्हा कळतं की ती त्यांची खरी मुलगी नाही तेव्हा सुरुवात होते तिच्या स्वत:च्या शोधाची. अर्थातच वडिलांचं सहकार्य नाममात्रच लाभतं. त्यांचा जीव तिच्यात खूप गुंतलाय हे जाणवतय पण आपल्या परिवारापासून त्यांनी आपल्याला वेगळं केलय याचा प्रचंड रागही आहे. नवीन भेटलेल्या माणसांवर प्रेम वाटतय पण तितकाच अनोळखीपणाही आहे. या सगळ्या मानसिक स्थित्यंतरांमधून जाणारा तिचा प्रवास छानच मांडलाय.
Belvedere - Bosnian- Herzegovian - 2010 - 90 min
शरीरावरच्या जखमा किती काळ राहतात? आणि भीतीच्या? Belvedere ही अशीच एक महायुद्धातून वाचलेल्या ज्यूंची छावणी. त्यातल्या एका कुटूंबाची कथा. कुटुंबातल्या ३ पीढ्यांची कथा. ज्यातली एक अख्खी पीढी नाहीशी झालिये पण तिचं अस्तित्व कायम जाणवत राहतं. प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात झालेल्या जखमांच्या खुणा वावरतायेत पण पुढची पीढी अगदीच अनभिज्ञ. कधी कधी या खुणा स्विकारायलादेखिल नाकारणारी तर कधी काहीच न समजून गोंढळून जाणारी. अफाट अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शन. आजोबा आणि त्यांचा लहानगा नातू. आजोबांच्या २ बहिणी. एकीने अख्खं कुटुंब गमावलय आणि त्यांना कुठे पुरलय याची जागा तरी कळावी यासाठी तिची चाललेली ओढाताण. दुसरीचा फक्त मुलगा वाचलाय, जो अमेरीकन रीअॅलीटी शो मध्ये जायचं स्वप्न पाहतोय. या सगळ्यांची ही कथा. प्रत्येकाच्या वेगळ्या मनःस्थितीची, सहनशीलतेची, भीतीची.. युद्धातल्या छळाइतक्याच भयानक त्याच्या आफ्टरइफेक्टची.. भीतीच्या जखमा कदाचित माणसाबरोबरच संपत असाव्यात. मस्ट वॉच.
Black Thursday (czarny czwartek) - Poland - 2011 - 105 min
७० च्या सुमारास पोलंड सरकारने अचानक केलेल्या अन्नधान्याच्या भाववाढीबद्दल कामगारांनी दिलेला लढा कसा दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला याची ही कथा. ७० चा काळ असल्यामुळे त्या प्रसंगांच्या मूळ चित्रफीती उपलब्ध होत्या. त्यातल्या घटनांची पार्श्वभूमी रंगीत चित्रपट म्हणून दाखवून, ती घटना ओरिजिनल कृष्णधवल स्वरुपातली, अशी या चित्रपटाची मांडणी केलेली आहे. घडणार्या घटना इतक्या त्रासदायक आहेत की या मांडणीचं कौतूक चित्रपट सुरु असताना मनात येत नाहीच. संपल्यावरच जाणवतं. मस्ट वॉच यादीतला अजून एक सिनेमा.

chhan!
:)
धन्यवाद आनंदयात्री.. :-)