"प्रमाणामध्ये सर्व काही असावे." या प्रमाणात असण्यामुळेच जग सुरळीत चाललय. पण तरीही सगळ्याच गोष्टी प्रमाणात नसतात. जसं की माझा राग... प्रमाणाबाहेर. मर्यादा सोडून. पण तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा आहेत. त्यामुळे तूही कधी कधी चिडतोस. मग म्हणतोस, "माझ्याही ऐकून घेण्याला मर्यादा आहेत. काय गरज आहे हे बोलायची. तुझ्या आजूबाजूच्यांनी काय कमी केलं का तुझ्यासाठी? देन लूक अॅट पॉसिटीव्ह अॅन्ड बी हॅपी." पण मला हे ऐकू येत नाही. तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा असल्याचं मला मुळीच आवडलेलं नसतं. आणि मला यावर अमर्याद चिडायचं असतं पण तुझी मर्यादा संपल्याने त्याचं रुपांतर अमर्याद रडण्यात होतं. हे मी तुला कळू देत नाही. आता कध्धीच तुला भेटायचं नाही असं मी ठरवते कारण हे रडणं अमर्याद चालू रहाणार आहे असं मला वाटतं. पण तसं नसतं. काही वेळाने ते संपतं.मला संपणार्या गोष्टी आवडत नाहीत. शाळेत असताना प्रत्येक वर्षी वर्ष संपायचं. खूपच्या खूप रडू यायचं तेव्हा. नव्याची ओढ वगैरे काही नाही.
पण अमर्याद असं काही नसतं म्हणे या जगात. जसं पूर्ण चांगलं आणि पूर्ण वाईटही काही नसतं. नथिंग इज ब्लॅक ऑर व्हाईट. एव्हरीथिंग इज ग्रे. पण मला ग्रे आवडत नाही. पण व्हाइट आवडतं. मला ब्लॅकही आवडतं. पण मला ग्रे आवडत नाही. त्यामुळेच कदाचित काहीच ब्लॅक किंवा व्हाईट नाही हे मला जास्त प्रकर्षाने जाणवतं. मला ब्लॅक किंवा व्हाईट ठरवणार्यांची अशा वेळी गंमत वाटते मग. मला अमर्याद व्हाईट व्हायचंय. ब्लॅकही चालेल. पण ते शक्य नसावं. तसं नसतं तर गोष्टी बदलल्या नसत्या. आधी भरघोस मिळायचा तो आता तुरळक मिळतो.. लिखाणाला प्रतिसाद. कदाचित आधी मी चांगलं लिहित असेन. पण आता नाही लिहित. म्हणजे माझ्यातल्या चांगलेपणाला मर्यादा होत्या. मला माझ्यातला चांगलेपणा आवडेनासा झालाय. मग आता काय आहे? वाईटपणा? की खरेपणा.. आणि जे काही आहे ते अमर्याद की पुन्हा मर्यादित?
सगळं काही अमर्याद असलं पाहिजे. प्रेम अमर्याद, विरह अमर्याद, रागही तसाच, लोभही तसाच आणि जन्मही तसाच.. जन्म अमर्याद नाही. म्हणून मला अवकाश आवडतो. कारण तो अमर्याद आहे. पण मला पृथ्वी आवडत नाही, तिला मर्यादा आहेत. मला अवकाशाचा भाग व्हायचंय म्हणजे मी ही अमर्याद होईन. मरणाचं अवकाश वेढून असलेल्या जन्मापासून माझी सुटका होईल जेव्हा मी अवकाशाचाच भाग होईन. मी मरणाचा भाग होईन.. भाग नाही, मी मरण होईन.. अमर्याद मरण..!

स्वप्नभरल्या लोचनांना त्रास नुसता..
चांदणे आहे खरे की भास नुसता..
एक मैफल या इथे भरली निनावी..
वाचणारा बांधतो अदमास नुसता
एकंदर लेखन छान.शुभेच्छा.
धन्यवाद केदार.. एकंदरीत बरंच वाचलेलं दिसतय.. :-)
एकातून एक... विचारशृंखला छान उतरली आहे..
एक मैफल या इथे भरली निनावी..
वाचणारा बांधतो अदमास नुसता
Kedar, tumacha ahe ka ha sher?
:-)
धन्यवाद आनंदयात्री.. :-)
आनंदयात्री, शेर माझाच आहे. कुछ सामान..यांच्यापासून प्रेरणा घेतली.
तुमचं लिखाण मला नेहमीच खूप आवडतं. खूप छान लिहिता तुम्ही. मी या ब्लॉगची जबरदस्त fan आहे.....
Thanks a lot इंद्रधनू.. :-)