मेरा कुछ सामान ...
हा एक तुकडा तुझा..
आणि हा तुझा..
हा माझा खूप आवडीचा आणि लखलखता,
हा तुझ्याचपाशी असला पाहिजे..
आणि बाकी राहिलेलं सगळं तर आहेच माझं..
नाही का?
.
.
.
.
आता लक्षात येतय, माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं,
गहाळ होऊन गेलय कदाचित ते कधीच,
आणि असेलच तर ते बाकी तुकड्याशिवाय पूर्ण होत नाही,
सगळे तुकडे वेगवेगळ्या दिशांना ओढतात आता,
त्यांना जोडून ठेवण्यात दमछाक होते
आणि हाती काहीच लागत नाही..
कोणे एके काळी जन्माला आले तेव्हा एकसंध होते मी कदाचित...
2 Responses
  1. Anil Says:

    ह्म्म.. होतं खरं असं आणि त्याची सलही राहतेच.
    आता या अनुभवावर कुरघोडी करण्यासाठी म्हणून नव्हे, पण याला समांतर जाणारी.. एका वेगळ्या जगातली.. अशी.. आरती प्रभूंची "तूं कुणाला मी म्हणूं" ही कविता आठवतेय मला..

    दोन हे आहेत पेले आपले नाही जणूं :
    कोणता आहे तुझा अन् कोणता माझा म्हणूं ?
    दोनही झालेत उष्टे : गरळ कंठी दे जळूं,
    दोनही तारांतून गs वीज लागो झण्‌झणूं.
    दोन हे आहेत पेले : एक माझा संपला,
    झाकुनी अर्धाच पेला टेकिली कां वर हनू ?
    दे तुझा : झोकून घेतों, आणि माझा घे तुला,
    होत जागीं रानगीतें : ह्रदय लागे गुणगुणूं.
    तोही केलास तूं रिकामा : तोल जातो कां ढळूं ?
    नेत्र हे रेंगाळती का सज्ज करिसी की धनू ?
    दोन धारा एक झाल्या या प्रवाहीं : तूं नि मी,
    पूर येतो वाढणारा, आपली नाही तनू.
    दोन कोठे ? एक झालों - शून्य झालों की अशी :
    तूं कुठे अन् मी कुठे अन् तूं कुणाला मी म्हणूं ?