मेरा कुछ सामान ...
Hii..!
प्रिय लिहिलं नाही कारण तू मला प्रिय आहेसच याची मला खात्री नाही. किंवा खूप जास्त प्रिय असावीस. Narcissist ना शेवटी.. ह्म्म्म.. कशी आहेस? म्हणजे आता मला खरच आठवत नाही की तू कशी आहेस. स्वतःविषयी विचार करताना मला नेहमी असं वाटतं की, ' अर्रे मी अशीच तर आहे पहिल्यापासून, फक्त आता स्वतःविषयी अमुक अमुक गोष्ट शब्दांत मांडू शकते. (आणि गरज पडलीच तर त्यामागची कारणमीमांसादेखिल स्पष्ट करु शकते.)' असो, तर याप्रकारे तुझ्याविषयीदेखिल मला काही आठवत नाही, त्यामुळे काही नवीनही वाटत नाही.
हल्ली मी परत बोलायला लागलेय. म्हणजे खाई खाई सुटल्यावर माणसं जशी खात सुटतात तशी मी बोलत सुटलेय त्याच्याशी. त्यामुळेच मी त्याला माझी दर्दभरी दास्ताँ पण सांगितली. (वास्तविक, जे झालं त्याच्याविषयी मला दर्दच काय पण इतरही काही वाटत नाही.) पण बहुधा लोकांना दर्द वाटत असावा. म्हणून मग मी देखिल तो वाटू देते. म्हणजे मलाही कधी कधी रडायला हक्काचा खांदा मिळेल अशी आशा वाटते. खरंतर तो नाही मिळाला तरी हरकत नसते. मिळाल्याचा आनंदही नसतो, बरं, तो खांदा मी वापरेनच याचीही खात्री नसते. पण हा खांदा मिळण्याचा प्रकार भलताच रोमँटीक असतो. खांद्यावर रडून झाल्यावर जे काही होतं ते मात्र प्रॅक्टीकल असतं. (की नॅचरल?) पण खरी गंमत ही नाहीये. खरी गंमत ही आहे की, हे सगळं माहित असूनही असंच व्हावसं वाटतं. (व्हावसं वाटतच असंही नाही पण होऊ नये यासाठीही मी काही करत नाही.)
मी फार मी मी करते. कदाचित मला दुसरं काहीच करता येत नसावं. हे जाणवलं की मी विचार करते. shame based conscience आणि guilt based conscience यातला कुठला मला जास्त सूट होईल याचा. कुठलाच नाही असं उत्तर मिळालं की मला विकृत असल्यासारखं वाटतं. आत्महत्या करणे हा चांगला मार्ग असू शकतो पण ते फारचं रोमँटीक वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात मी भलतीच प्रॅक्टीकल असल्यामुळे मला ते जमणार नाही हे ही जाणवतं. स्वतःला नाकारण्यात काही हशील नाही कारण मग माझं नसलेलं conscience कुठूनसं "खोटारडी! खोटारडी" म्हणून ओरडू लागतं. स्वतःला स्विकारणं हा रोमँटीसिजम आहे. त्यामुळे तो ठराविक काळानंतर संपतो. माझ्याबाबतीत तो संपला आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना अर्थ नाही.
मिळवायचंय ते मिळत नाही ही समस्या नाहीच आहे. काय मिळवायचं तेच समजत नाही ही समस्या आहे. बरं ते समजलं आणि काही मिळालं तरी मग त्यानंतर इतर काही हवसं वाटणारच नाही याची काय खात्री? किंबहुना असं वाटेल याचीच शक्यता जास्त. मग मला काहीच मिळवावसं वाटत नाही. तरी पण मी उत्तरं मिळवते. मिळवायला, गमवायला किंवा बदलायला ती माणसांपेक्षा कमी हानिकारक असतात.  बायका कन्फ्युज असतात असं पुरुषांचं मत असतं हे मला हल्लीच कळलं. आपल्यात बाईपणाचा अवशेष सापडला याचा आनंद मानून घ्यावा असा माझा विचार होता पण मग मला इतर बर्‍याच गोष्टींप्रमाणे याही गोष्टीचा बाईपणाची स्पेसिफिक संबंध लावता येत नाही असं कळलं.
मला पाऊस पडताना परत परत का रोमँटीक वाटत रहातं याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न चालुये सध्या. असं वाटणं हा मी स्वतःशी केलेला अजून एक खोटारडेपण आहे असा निष्कर्ष निघाल्यास मला खूप काळाने परत एकदा वाईट वाटू शकतं.
असो. आजच्याला इतकच. काळजी घे म्हणत नाही मी तुला. कारण ते खोटं वाटतं. You are sane (selfish?) enough to take care of yourself. जाते.
Bye..!
7 Responses




  1. Anil Says:

    I don't believe this, it's very similar talk I had with myself few times. And I couldn't even fully express it to myself. But man-o-man, here you are.. making it feel so real & blur (yes, as it is) through your writing! एकाच वेळी स्वतःच्या sensitivity, sensibility, disgust, selfishness, selflessness, rationalism, realism, romanticism, integrity या सगळ्यांच उदात्तीकरण, त्यांची घुसमट आणि त्यांनाच ठेऊन दिलेली चपराक! …amazing and hurting at the same time. ...आणि ती शेवटची ओळ, सहन नाही होत ती.. दरदरून भिती वाटते आणि स्वतःसाठीच रडावंस वाटतं मग. आणि हेहि वाटतच असतं की हे असं नाहिये.. नाहितर इतका जीव खरंच झिजवला असता का? ...जे मी आता इथे बोलण्याचा प्रयत्न करतोय ते Rilke-ने हे खूप awesome मांडलंय.. बघ ना..

    She who did not come, wasn't she determined
    nonetheless to organize and decorate my heart?
    If we had to exist to become the one we love,
    what would the heart have to create?

    Lovely joy left blank, perhaps you are
    the center of all my labors and my loves.
    If I've wept for you so much, it's because
    I preferred you among so many outlined joys.

    -- Rainer Maria Rilke


  2. No words...! Hats off to the lines...
    And yea.. I can once again say, you have correctly experienced the situation.. :-)


  3. Anil Says:

    रामराम! :-) लई दिस ज्हाले काय खबरबात नाय, म्हूंन म्हण्लं करावी उलशीक इचारपूस.. कशा आहात तुमी? पाऊस उगाचंच पडलाय बरं का आज!.. कायंच्या कायं पण.. खरंच, उगाचंच!.. असो, ही झाली माझी संकोचनिवळणीची हलकीशी तर्‍हा!.. कशी वाटली? तसा इथे, या जागी तितकासा संकोच नाहीच म्हणा, पण जेवढा काही उलसाक आहे तो निवळायला हवा!.. नाही का? बरं कारणही तसंच झालं कि, एक कविता वाचण्यात आली!.. तशी ती आधीही वाचली होती म्हणा, पण वाईट सवय मला– शिर्षकाकडे लक्ष नं देण्याची.. ती भोवलेली. पण अलिकडेच लक्षपुर्वक पाहीलं आणि साक्षात्कारी क्षण पुढ्यात येऊन ठाकला!.. त्यानंतर पहीली गोष्ट काय घडली असेल तर तुमचं हे पोस्ट आठवलं!.. मग हे बोलता यावं असं कुणी शोधतंच असतो मी असल्या गोष्टी समोर आल्या कि!.. आणि अशा वेळी नेमक्या तुम्हीच समोर येता माझ्या त्याला मी तरी काय करू. आता बाकी तसं म्हणा, स्वतःच्या शोधात भटकणारी माझ्या आवडीची अशी ८-१० पोस्ट आहेत इथे, पण नेमकं हेच मनात आलं.. "स्वतःस पत्र?".. का ते माहीत नाही, पण कडाडून आठवलं एकदम! आणि मग इथे लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता. ह्म्म.. as usual खूपच लांबण लावलीय मी आजही. मुद्द्यावर येतो आता.. तर गोष्ट अशी की.. स्वतःशी बोलताना, स्वतःला स्वतःचंच आयुष्यं काय आहे ते सांगताना खूप काही बोलून गेलोय.. खूपच! आणि तुमचंही याबाबतीत काय काय वाचून हादरे बसलेच आहेत.. बसताहेतच! पण हे जसं लिहिलंय त्याला तोड नाही.. स्वतःच्या शोधात भटकणार्‍या माझ्यासारख्यांसाठी तर ही खूप मनातली असली तरीही खरंच एक साक्षात्कारी कविता आहे!.. म्हणजे बघा ना, "ardent detour".. yes, स्वतःपर्यंत पोहचण्याचा खूप दूरचा असा झपाटलेला मार्ग.. जो रक्तात अशी थरथरणारी तरलता पेरत जातोय दिवसेंदिवस.. खरंतर, स्वतःची कधीच नं होणारी भेट घेण्यासाठीचा चालावा लागणारा हा मार्ग हेच माझं अस्तित्व आहे– असा थरकून सोडणारा मंत्र रिल्केने ह्र्दयात आपसूक पण किती निकराने सोडून दिलायं बघ ना!.. this is Rike's "Interior Portrait".. स्वतःलाच म्हणतोय रिल्के..

    Interior Portrait

    You don't survive in me
    because of memories;
    nor are you mine because
    of a lovely longing's strength.

    What does make you present
    is the ardent detour
    that a slow tenderness
    traces in my blood.

    I do not need
    to see you appear;
    being born sufficed for me
    to lose you a little less.

    – Rainer Maria Rilke