मेरा कुछ सामान ...
स्वप्नभरल्या लोचनांना त्रास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता..

परतवूनी लावले मी आसवांना
मग मुक्याने सोडला नि:श्वास नुसता..

बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..

एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..

भास! सारे भास!! - अंती हे उमजता,
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..
4 Responses


  1. Anil Says:

    खूप आवडते मला ही गज़ल.. तिच्यातल्या भावनांची शब्दगुंफन आणि त्याबरोबर सहाजीकपणे येणाऱ्या एका विशिष्ट लयकारीमुळे! आणि ते श्वास मागणारे 'अबोली गंध' तर जीवच घेऊन जातात बघ! पुन्हा एकदा स्वप्नं आणि भास-आभास यांच्या कचाट्यात सापडून आसावलेलं आणि शेवटी उमजून परत मग सगळ्यातून निसटून गेलेलं मन.. त्याला कुठला दिलासा देऊन हे धुकं जरासं तरल करता येईल देव जाणे. कि सत्य आणि भास ही फक्त लेबलंच आहेत? स्वप्नांनी तारलं तर ते सत्य होऊन जातात आणि मारलं तर भास! असं कसं? इतकं दुर्दैवी आकलन कसं असू शकेल या सत्य-भासांमधे पसरलेल्या धुक्याचं? मला तरी तसं वाटत नाही. कुठलीशी स्वप्नं घेऊन, त्यांची वाट चालत राहून मग एक दिवस एखाद्या काठाशी आपसूक जाग आली तर कदाचीत स्वप्नांतलंच जग समोर दिसेलही. पण सत्य दिसण्यासाठी प्रयत्नपूर्वक सगळी स्वप्नंच फेकून देऊन मध्यरात्रीच जागे झालो आणि त्या काळोखालाच सत्य म्हटलं तर ते सगळं आपल्याला एका कृत्रिम अशा भकास उजेडाकडेच घेऊन जाणारं असेल. इसेही अगर सुफियाना अंदाज मे कहा जाये तो..

    यूं चरागा करके क्या जी बहला रहे हो जहाँवालों ?
    अंधेरा लाख़ रोशन हो, उजाला फ़िर भी उजाला हैं !


    आणि याच्याशीच तंतोतंत जुळणारा अजून एक दाखला देऊ का? जो मला या सत्य-भासांमधल्या धुक्याला एमिलीने दिलेला एक अप्रतिम असा दिलासाच वाटतो.. तो काहीसा असा कि.. Waking up is better than dreaming unless one wakes up at midnight! And other way around, dreaming of the dawn is better than a solid dawn leading to worthless day! I think (it's a guess!) that is what Emily said in one of her poems. Here it is.. this is how she goes about it.. sweetly..

    Dreams – are well – but Waking's better,
    If One wake at Morn –
    If One wake at Midnight – better –
    Dreaming – of the Dawn –

    Sweeter – the Surmising Robins
    Never gladdened Tree –
    Than a Solid Dawn – confronting –
    Leading to no Day –

    – Emily Dickinson