मेरा कुछ सामान ...

अजून मला आठवतात तुझ्यासोबतचे क्षण..
परत एकदा प्रेमात पडल्यासारखं काहीतरी झालेलं..
मनात म्हटलं हे काय भलतच,
आणि आयुष्याच्या अशा वळणावर...?
बरं.. तू असा जगमित्र,
मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..
अनंत विस्तारलेली क्षितिजं समोर घेवुन तू उभा,
आणि मी परतीच्या वाटा बंद झालेल्या वळणावर..
प्रश्न तुझ्या वार्‍यालाही फिरकत नाहीत,
आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी..
अजून आठवतात ते क्षण.. वेडावलेले..
युगांनंतर जिवंत झाल्यासारखं वाटलेलं..
गुलमोहराच्या झाडाखाली,
अमलताशाला कवेत घेवुन येणारं वारं,
स्पर्शून जात होतं तुझ्या-माझ्यातील पोकळीला..
तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्‍यावर
अष्टमीचा चंद्र वितळत चाललेला...
तुला खूप काही सांगायचं असताना,
न सुचलेले अर्धे-अधिक शब्द,
आपल्या त्या खळाळत्या हास्यात वळते करुन घेत होतास तू..
आणि तुला शहाणा म्हणू की वेडा ह्या संभ्रमात
मी अधिकाधिक रुतत चाललेली...
अजूनही आठवतात ते सगळे क्षण..
आणि मग माझीच नजर लागू नये तुला चुकून,
म्हणुन मग लपवुन टाकते तुला
माझ्या मनाच्या घनगर्द अंधारात..
आणि मग कधी एका क्षणी,
तुझं अस्तित्व विसरुन, स्वतःतच गुंग होऊन,
खोल उतरत रहाते त्या अंधारात..
आत.. आत.. खूप खोल..
आता वर पाहिलं तर आभाळही दिसत नाही..
खालच्या खोलीचा अंदाजही येत नाही..
अशा वेळी मला मग सोडावेच लागतात,
जिवाच्या आकंताने तुझ्या प्रतिमेचे घट्ट धरुन ठेवलेले हात..
हा तळ माझ्या एकटीचा..
ही वाटही माझ्या एकटीचीच..
पण आता व्याख्येत अडकुन रहायचा कंटाळा आलाय रे..
कशाला नसते अट्टहास..
हे जे काही आहे
त्यासकट मला आठवतात अजूनही..
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण...
8 Responses
  1. do Says:

    चार दोन शब्दात कवितेबद्द्ल / कवयित्रीच्या प्रतिभेबद्द्ल लिहिणं कठिण. नेहमीप्रमाणेच. :) उगाच काय भारी, मस्त असं विशेषणांत लिहायंच गं? (लिहिता आलं की लिहीनच सविस्तर.. (म्हणजे उगाच नव्हे हं!) म्हणून सध्या तरी येवढंच -> :)
    म्हणशील तर ह्यात खूप काही अर्थ आहे!


  2. धन्यवाद रे डु... :-) की dude? :-)


  3. एकच शब्द अप्रतिम



  4. Anil Says:

    काय बोलू आता.. फक्त मनाला आवर आणि समजूत घालण्यासाठी म्हनून त्या दोन ओळी आठवाव्याशा वाटतात..

    मंजिलें इश्क से गुजरना तो आसान हैं इक बार,
    इश्क इक नाम हैं खुद अपनेसे गुजर जाने का..


  5. राऊळ साऊल,
    वाहवा! काय ओळी आहेत.. अप्रतिम.. कोणाच्या आहेत?


  6. Anil Says:

    ग्रेसकडून ऐकलेल्या या ओळी. 'संध्यासुक्तांचा यात्रिक' या interview-मधे (it’s a set of 2 CDs.. just amazing!). आणि माहित आहे का, ग्रेस ओळी बदलतो कधी कधी... त्याला जे म्हणायचं आहे ते express करण्यासाठी. awesome वाटतं ते मला! मनात घर करून राहतं.

    खरंतर हा कलाम असा आहे..

    कोई समझायीये कि क्या रंग हैं मैखाने का
    आँख साक़ी कि उठे, नाम हो पैमाने का

    गर्मै-ए-शमा का अफ़साना सुननेवालों
    रक़्स देखा नहीं तुमने अभी परवाने का

    चश्म-ए-साक़ि मुझे हर गम पे याद आती हैं
    रास्ता भूल ना जाऊँ कहीं मैखाने का

    अब तो हर शाम गुज़रती हैं इसी कुचें में
    ये नतीजा हुआ नसेह तेरे समझाने का

    अब तो हर मंज़िल से गुज़रना है आसान “इक़्बाल”
    इश्क़ है नाम खुद अपने से गुज़र जाने का

    - इक़्बाल साफ़ी पुरी

    see.. now it does not sound that good. :-(

    अजूनही बरंच बोलावंस वाटतंय.. लेकीन फिर कभी.. फुरसतमें..


  7. व्वा.... क्या बात है.. भारीच आहे.. :-) ह्म्म... फुरसत.. That whole another issue.. दिल ढुंढता है फिर वही... :-)