हा पहा हा चाललेला थोर मेळा
पाप स्वप्नी पण असे तोरा निराळा..
आज संधी लाभली अन बोलला तो
पापण्यांच्याही पहार्यातून डोळा..
राजहंसा ना तमा ह्या कावळ्यांची
होऊ दे वाटेल तितकी फौज गोळा...
गे, बटा का परत आणे चेहर्यावर
का हवा वार्यास वेडा हाच चाळा..
बोलती रागावल्या गोपी कुणाला
जा.. नको ना माठ फोडू खोडसाळा..
रंग माझा वेगळा हे जाणते मी
पांढरा वाटो कुणा वाटेल काळा..
पाप स्वप्नी पण असे तोरा निराळा..
आज संधी लाभली अन बोलला तो
पापण्यांच्याही पहार्यातून डोळा..
राजहंसा ना तमा ह्या कावळ्यांची
होऊ दे वाटेल तितकी फौज गोळा...
गे, बटा का परत आणे चेहर्यावर
का हवा वार्यास वेडा हाच चाळा..
बोलती रागावल्या गोपी कुणाला
जा.. नको ना माठ फोडू खोडसाळा..
रंग माझा वेगळा हे जाणते मी
पांढरा वाटो कुणा वाटेल काळा..