मेरा कुछ सामान ...
हे म्हणजे भलतंच...
माध्यम आलं म्हणजे माध्यमाची चौकट आली..
बंधनं आली..
गावाला पोहचणं लांब राहिलं..
गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीच्या नियमांनीच जीव काढलाय..
बरं सगळं असच असावं ना मग.
तर ते ही नाही..
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्‍याखोर्‍यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..
6 Responses


  1. @ माध्यम - Aprateem! अफाट वेगाचं वेड घेवुन दर्‍याखोर्‍यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ, आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय - Kya baat hai... 'Crisis' simplified.

    @Smita Patlanvarcha lekh - Titkaach aprateem. :)



  2. आज सकाळी अचानक डोक्यात विचार आला - 'क्या खोया क्या पाया' या कवितेत 'प्रिथ्वी लाखों वर्ष पुरानी जीवन एक अनन्त कहानी पर तन की अपनी सीमायें यद्यपि .... ' या कडव्यातल्या 'पर तन की अपनी सीमायें' मधून अटलबिहारी वाजपेयींना असंच काहीतरी म्हणायचं असेल का?


  3. कविता वाचली नाहीये. माहिती पण नाहीये. इथे देवु शकाल का? किंवा मेल कराल? प्रतिसादात आपण दिलेल्या ओळींवरुन तरी असच वाटतय.. :-)
    merakuchhsaman@gmail.com