मेरा कुछ सामान ...
मला समजलिये
स्वप्नांच्या प्रदेशाला जाणारी वाट..
चंद्राशिवायच्या चांदण्यांनी भरलेल्या रात्रीत,
जेव्हा चांदण्या उतरलेल्या असतात क्षितिजावर
एका उडीत चांदण्यांवर पाय पडतील इतक्या जवळ..
आणि मग त्या चांदण्यांचे ठसे घेवुन जातिल मला
स्वप्नाच्या प्रदेशात..
जवळच आहे..
स्पष्ट दिसतिये वाट..
तिथवरच तर चालायचय...
.
.
.
क्षितिजापर्यंत....
1 Response
 1. ani` Says:

  आहाहा!.. अशी सहज मनातून आरपार जाणारी ही कविता.. खूप कमी शब्दांत जादुई वाटावं असं काहीसं लिहून गेलीस बघ.. ते जवळचं-दूरचं क्षितीज आणि ही चांदण्यांची वाट.. मग सावल्यांतून गळणारे स्वप्नांचे कवडसे घेऊन आता उरातली गाणी गात चालत रहावं बस्स्..

  मेहदी हसन-ने अगदी भूल पडावी अशी गायलेली एक गझल.. तिच्या दोन ओळींची खूप आठवण येतेयं आज..

  वो ही क़ुर्ब-ओ-दूर की मंज़िलें..
  वोही शाम ख़ाब-ओ-ख़याल की..

  कोई हद नहीं है कमाल की..
  कोई हद नहीं है जमाल की..

  [क़ुर्ब ≈ near, जमाल ≈ beauty]